Lokmat Agro >शेतशिवार > कोबीच्या बोगस बियाणांची विक्री; विक्रेता, कंपनीविरोधात गुन्हा दाखल

कोबीच्या बोगस बियाणांची विक्री; विक्रेता, कंपनीविरोधात गुन्हा दाखल

sale of bogus cabbage seeds; A case has been registered against the seller and the company | कोबीच्या बोगस बियाणांची विक्री; विक्रेता, कंपनीविरोधात गुन्हा दाखल

कोबीच्या बोगस बियाणांची विक्री; विक्रेता, कंपनीविरोधात गुन्हा दाखल

शेतकऱ्यांना मिळाला न्याय : मंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई

शेतकऱ्यांना मिळाला न्याय : मंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई

शेअर :

Join us
Join usNext

कोबीचे बियाणे बोगस निघाल्याने कंपनी व कृषी सेवा केंद्राच्या संचालकांविरोधात लासलगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संदीप एकनाथ नागरे (रा. डोंगरगाव ता. निफाड) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सेमिनीस कंपनीचे प्रवीण आंबरे, पालकर (पूर्ण नाव माहिती नाही) आणि नाशिक येथील कृषी सेवा केंद्र चालक गोकुळ दामोदर मानकर यांच्या विरोधात शनिवारी (दि. २) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

फिर्यादी संदीप नागरे यांनी दिनांक २ मे २०२३ रोजी पंचवटी, नाशिक येथील मानकर अँड सन्स कृषी सेवा केंद्र येथून सेमिनिस कंपनीचे ग्रीन चॅलेंजर नावाचे कोबीचे बियाणे ५० पुड्या, तसेच महिको कंपनीचे कॅबेज- भुजबळ यांनी ११८ नावाचे कोबीचे बियाणे फिर्यादीचे मावस भाऊ विश्वास विठोबा कुटे यांनी खरेदी केले होते. त्यानंतर दिनांक १० ऑगस्ट रोजी कंपनीचे मॅनेजर प्रवीण आंबरे यांनी प्रत्यक्ष शेताला भेट दिली. मात्र, त्यांनी नुकसानभरपाईची मागणी फेटाळली. त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने तालुका कृषी अधिकारी पवार आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी खेडकर यांनी प्रत्यक्ष पिकाची पाहणी करून सुमारे ९० के नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात केली आहे. मात्र, दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे संदीप नागरे आणि विश्वास कुटे यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन आपबीती सांगितली. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.

  •  खरेदी केलेल्या बियाणांची त्यांनी दोन ठिकाणी पेरणी केली. नागरे आणि कुटे परिवाराने पिकाची वेळोवेळी काळजी घेतली. महिको कंपनीच्या बियाणाचे पीक चांगले येऊन त्याची विक्रीही झाली; परंतु, सेमिनीस कंपनीच्या बियाणामुळे कोबीच्या पिकाची वाढ होऊनही कोबी गडेची वाढ न झाल्याने शेतकऱ्यांनी सेमिनिस कंपनीशी संपर्क साधून माहिती दिली.

Web Title: sale of bogus cabbage seeds; A case has been registered against the seller and the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.