छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील : पैठण तालुक्यातील ढोरकिन परिसरातील तलाव, नाले, पडिक जमीन, बांधांवर मोठी चंदनाची झाडे होती. परंतु, गेल्या काही वर्षांपासून चंदन चोरीचा सपाटा सुरू असून, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील बहुगुणी चंदन वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
चंदन वनस्पतीपासून साबण, तेल, अत्तर, सुगंधी अगरबत्ती, विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने, औषधे, जपमाळ आदी वस्तू बनवल्या जातात. ढोरकिन परिसरातील तलाव, नाले, पडिक जमीन, बांधावर मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे होती.
चंदन वनस्पती हलक्या, भारी, मध्यम, रेताड, मुरमाड, पडिक आणि काळीची सानवटी, चुनखड आदी प्रकारच्या जमिनीमध्ये सहज उगवते. ही वनस्पती उगवल्यानंतर जवळपास १५ ते २० वर्षांनंतर त्यातील मुख्य खोड व सोटमुळात सुगंधी गाभा तयार होतो.
परंतु, गेल्या काही वर्षांपासून चंदन चोरीचा सपाटा सुरू आहे. दिवसा टेहळणी करून रात्रीच्या वेळी चंदनचोर चंदन चोरीचा डाव आखतात. या वनस्पतीची विक्री चोर विविध कंपन्यांना एजंटच्या माध्यमातून करत असून, त्यातून प्रचंड पैसे मिळवले जात आहेत.
हेही वाचा : Brown Rice : उत्तम आरोग्याची हमी असलेला आरोग्यदायी ब्राऊन राईस