दरीबडची : जत पूर्व भागात उन्हाळ्यात द्राक्षबागांना पाणी कमी पडल्याने काड्या तयार झाल्या नाहीत. पाणी व ऊन समप्रमाणात न मिळाल्याने अपेक्षित फळधारणा झाली नाही.
बेदाणा उत्पादनात घट झाली आहे. प्रतिएकरी उतारा कमी झाला आहे. बेदाण्यात जवळपास ४० टक्के घट झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक बागायतदार अडचणीत सापडला आहे.
तालुक्यात ६ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थिती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत.
पाण्याचा काटकसरीने वापर करीत बागा फुलविल्या आहेत. शेततलाव बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते.
दर्जेदार व सुट्याखाण बेदाण्याची निर्मिती पूर्व भागातील उमदी, सिद्धनाथ, संख, बेळॉडगी, भिवर्गी, सुसलाद, जालिहाळ बुद्रुक, बालगाव, दरीकोणूर, करजगी, बेळोंडगी, हळ्ळी, मुचंडी, जालिहाळ खुर्द परिसरात होते.
जत पूर्व भागात गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती. शेत तलाव, कूपनलिका विहिरी कोरड्या पडल्या होत्या. खरड छाटणी पाण्याअभावी रखडली. पाण्याअभावी बागेची खरड छाटणी जून, जुलै महिन्यात घेतल्या आहेत.
खरड छाटणीच्या वेळी पाणी कमी मिळाले. टँकरने पाणी घालून बागा जगविल्या आहेत. टँकरसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. पाणी कमी पडल्याने काड्या तयार झाल्या नाहीत. अपेक्षित फळधारणा झाली नाही. परिणामी उत्पादनात घट झाली आहे.
३०० ते ३५० रुपये बेदाण्याला उच्चांकी दरकमी प्रमाणात द्राक्ष घड सुटले. अपेक्षित फळधारणाही झाली नाही. उत्पादन घटले. त्याचा फटका द्राक्ष उत्पादन व बेदाणा निर्मितीला बसला आहे. सध्या बेदाणाला ३०० ते ३५० रुपये दर आहे. बेदाणाचे उत्पादन कमी झाले आहे.
गेल्या उन्हाळ्यात पाणी कमी पडले. काड्या तयार झाल्या नाहीत. त्यामुळे या वर्षी घड कमी सुटले. द्राक्षाचे उत्पादन घटले. बेदाणा उत्पादन कमी झाले. शासनाने कर्ज, वीज बील माफ करावे. अशी मागणी आहे. - प्रवीण अवरादी, बेदाणा उत्पादक, संख
अधिक वाचा: राज्यातील ऊस गाळप हंगाम संपला; कोणत्या विभागात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर