सप्तधान्यांकुर अर्क हे पिकासाठी अत्यंत महत्वाचे आहे, कारण पिकाची प्रत आणि उत्पन्न वाढते. सप्तधान्यांकुर बनविण्यासाठी आवश्यक साहित्य व ते कसे बनवाल याबद्दल माहिती पाहूया
साहित्यतीळ, मुग, उडीद, चवळी, मटकी, हरभरा, गहू प्रत्येकी १०० ग्रॅमपाणी २०० लिटर गोमुत्र १ लिटर
तयार करण्याची पध्दत१) प्रथम एका वाटीमध्ये १०० ग्राम तीळ घ्या व ते भिजत ठेवा.२) दुसऱ्या दिवशी मोठ्या भांड्यामध्ये मुग, उडीद, चवळी, मटकी, हरभरा, गहू प्रत्येकी १०० ग्रॅम घ्या. या सगळ्यांना मिसळून धान्य भिजेल एवढे पाणी टाका.३) तिसऱ्या दिवशी धान्य पाण्यातून काढून घ्या आणि एका ओल्या फडक्यात बांधा व मोड येण्यासाठी लटकून ठेवा भिजवलेले पाणी फेकून देऊ नका.४) एक सेमी मोड आल्यावर सगळ्यांची चटणी करावी.५) त्यानंतर २०० लिटर पाणी १० लिटर गोमुत्र कडधान्य भिजवलेले पाणी चटणी मिसळून घ्या. गोणपाटाने ४ तास झाकून ठेवा.६) चार तासानंतर पुन्हा ढवळून गाळून घ्या आणि त्याची फवारणी करा.
फवारण्याची वेळ१) दाणे दुधावर असताना.२) फळ किवा शेंगा लहान असताना.३) फुलकळी अवस्थेत असतांना फवारणी करणे.प्रधान सेवा केंद्र, दिंडोरी, जि. नाशिक ७७५७००८६५२sssardct@gmail.com