Lokmat Agro >शेतशिवार > Satbara: सातबारा उताऱ्यांचे डाऊनलोड तीन दिवस राहणार बंद

Satbara: सातबारा उताऱ्यांचे डाऊनलोड तीन दिवस राहणार बंद

Satbara: Download of Satbara utara land record will be closed for three days | Satbara: सातबारा उताऱ्यांचे डाऊनलोड तीन दिवस राहणार बंद

Satbara: सातबारा उताऱ्यांचे डाऊनलोड तीन दिवस राहणार बंद

Satbara Download भूमी अभिलेख विभागाचे ऑनलाइन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै दरम्यान विभागाची सर्व पोर्टल बंद राहणार आहेत.

Satbara Download भूमी अभिलेख विभागाचे ऑनलाइन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै दरम्यान विभागाची सर्व पोर्टल बंद राहणार आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : भूमी अभिलेख विभागाचे ऑनलाइन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै दरम्यान विभागाची सर्व पोर्टल बंद राहणार आहेत. परिणामी तीन दिवसांच्या काळात सातबारा उतारा, मिळकत पत्रिका, फेरफार उतारे ऑनलाइन डाऊनलोड करता येणार नाहीत, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.

ई-फेरफार, ई-हक्क, ई-चावडी तसेच ई-महाभूमी या पोर्टलवरून सातबारा उतारे, आठ अ, मिळकत पत्रिका, फेरफार उतारे ऑनलाइन डाऊनलोड करता येतात. या पोर्टलचे सॉफ्टवेअर जुने झाल्याने सध्या वेगाची मर्यादा येत आहे. उतारे डाऊनलोड करताना अडचणी येतात.

हे सॉफ्टवेअर २०१६ पासून वापरात आहे. त्यात आधुनिकता आणणे गरजेचे होते. त्यामुळेच भूमी अभिलेखने हे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी विभागाकडून चालविण्यात येणारी सर्व पोर्टल १९ जुलैच्या सायंकाळी ६ वाजेपासून २२ जुलैच्या रात्री १२ पर्यंत बंद राहतील.

कमी वेळात उतारे होणार डाऊनलोड
नवीन सॉफ्टवेअर हे २०२४ मध्येच तयार करण्यात आले आहे. त्याची चाचणी यशस्वी झाली असून, त्याचा वापर सुरू झाल्यानंतर उतारे कमी वेळेत डाऊनलोड होतील, अशी माहितीही नरके यांनी यावेळी दिली. सध्या ई-पीक पाहणी, खरीप पीक विमा योजना तसेच अन्य योजनांसाठी शेतकरी अर्ज करत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यांनी १९ जुलैपूर्वीच काढावीत, जेणेकरून अर्ज करताना अडचण येणार नाही, असेही नरके यांनी सांगितले.

नागरिकांना उतारे डाऊनलोड करण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. गरजेनुसार उतारे १९ जुलैपूर्वीच काढून ठेवावेत. २३ जुलैपासून सर्व पोर्टल पूर्वीप्रमाणेच काम करतील. - सरिता नरके, राज्य समन्वयक, ई- फेरफार प्रकल्प, भूमी अभिलेख विभाग, पुणे

 

Web Title: Satbara: Download of Satbara utara land record will be closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.