Satbara Mohim : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात तहसीलदारांनी राबविलेल्या 'जिवंत सातबारा मोहिमे'ची (Satbara Mohim) जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दखल घेत ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.
महसूल विभागाच्या १०० दिवस कृती कार्यक्रम आराखड्यांतर्गत १ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या मोहिमेंतर्गत सातबारावरील (Satbara Mohim) मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत यात केली जाईल. (Satbara Mohim)
'ई-हक्क' प्रणालीद्वारे अर्ज प्रक्रिया
यासोबतच, अर्ज प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी करण्यासाठी 'ई-हक्क' प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. तसेच या कालबद्ध कार्यक्रमात संबंधित तहसीलदारांना मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असून, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान वारसांना सातबारा नोंदणी करण्याची या मोहिमेच्या माध्यमातून मोठी संधी आहे. १ ते ३१ मार्चपर्यंत कालबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम जिल्हास्तरावर राबविला जाईल.
कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रक्रिया :
१ ते ५ मार्चदरम्यान ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या मयत खातेदारांची यादी तयार करणे.
६ ते १५ मार्चदरम्यान वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव मंजूर करणे.
१६ ते ३१ मार्चदरम्यान ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी वारस फेरफार तयार करून वारस फेरफार मंजूरकरणे.
अर्ज करण्याचे आवाहन
ही विशेष मोहीम वारसांना शेतजमिनीशी संबंधित हक्क मिळवण्यासाठी मदत करेल. त्यामुळे ज्या वारसांची नोंद अद्याप सातबारावर झालेली नाही, त्यांनी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ही कागदपत्रे आवश्यक !
खातेदाराचा मूळ किंवा प्रमाणित मृत्यू दाखला, सर्व वारसांच्या वयाच्या पुराव्याची साक्षांकित प्रत, सर्व वारसांच्या आधारकार्डची साक्षांकित प्रत, वारसाबाबत विहित नमुन्यातील शपथपत्र, स्वयंघोषणापत्र, अर्जातील सर्व वारसांचा पत्ता, भ्रमणध्वनी यांचा पुराव्यासह तपशील आवश्यक आहे.
जिवंत सातबारा म्हणजे काय?
सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची अद्यावत करणे. ही प्रक्रीया अतिशय किचकट असते त्यात अनेक अडचणी येतात. हीच बाब लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यात 'जिवंत सातबारा मोहीम' राबविण्यात येत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Viral Vihir Story: गोष्ट एका व्हायरल विहिरीची जाणून घ्या सविस्तर