Join us

कृषि विज्ञान केंद्राचा सल्ला शेतकऱ्यांस उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2023 4:00 AM

कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर, ता. कळमनुरी जि. हिंगोली कृषि विस्तार उपक्रमाच्या अंतर्गत कृषि विज्ञान मंडळाची दुसरी आढावा बैठक संपन्न ...

कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर, ता. कळमनुरी जि. हिंगोली कृषि विस्तार उपक्रमाच्या अंतर्गत कृषि विज्ञान मंडळाची दुसरी आढावा बैठक संपन्न झाली. हा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र तोंडापुरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन हरित क्रांतिचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमा मध्ये कृषी विज्ञान केंद्र तोंडापुरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी सादरीकरण करत असताना कृषि विज्ञान मंडळची कार्य पद्धती, उदेश, कामे उपस्थित सर्व कृषि विज्ञान मंडळाचे प्रतिनिधी यांना समजावून संगितले व कृषि विज्ञान केंद्राच्या सल्याने आपण शेती करावी व आजच्या बैठकी मध्ये मिळालेली महिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असे सागितले.

या बैठकी मध्ये श्री. राजेश भालेराव विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) यांनी सोयाबीन, कापूस व तूर पिका मध्ये शास्त्रीय पद्धतीने पिक व्यवस्थापन करावे व पावसाचा अंदाज घेऊन खत व्यवस्थापन करणे गरजेचं आहे असे सांगितले.

त्याचबरोबर प्रा. अजयकुमार सुगावे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) यांनी सोयाबीन मध्ये मर, शेंड आळी चे व्यवस्थापन कसे करावे, कापसामधील मावा, तुडतुडे यांचे नियोजन, हुमणी या किडीचे व्यवस्थापन या विषयाची सविस्तर माहिती दिली व किडीचे एकात्मिक व्यवस्थापन कृषि विज्ञान केंद्राच्या सल्याने करावे असे आवाहन त्यांनी केले.

श्री. साईनाथ खरात विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र) यांनी सोयाबीन व तूर पिकामध्ये एकात्मिक अन्य द्रव्य व्यवस्थापन, शिफारसीनुसार रासायनिक खत मात्रा याचे योग्य नियोजन कसे करावे आणि जमिनीचा पोत सुधारण्याकरिता अंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा असे सांगितले.

तसेच डॉ. अतुल मुराई विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेल्या मोबाइल ऍपची व कृषि विज्ञान मंडळाची स्थापना लगतच्या गावामध्ये करावी असे सांगितले.

डॉ. कैलास गिते कार्यक्रम सहायक, (पशु विज्ञान) यांनी दुधाळ जनावरातील एकात्मिक किड नियंत्रण, पशु खाद्य म्हणून आझोला चा वापर, शेळ्या मध्ये चाटण विटाचा वापर व परस बागेतील कुकुटपालन या विषयी मार्गदर्शन केले.

या बैठकीमध्ये शेतकरी बाधवांनी त्यांचे प्रश्न मांडले यामध्ये कापसामधील मावा व तुडतुडे यांचे नियोजन कसे करावे, शेंड अळीचे व्यवस्थापन कसे करावे, सोयाबींनचे पान पिवळं पडण्याची कारणे, मुरमाड जमिनीचे व्यवस्थापन, गाई मध्ये लसीकरण कधी व कोणते करावे, गुरांमध्ये गालफुगीचे कारण, कापूस/सोयाबीन/तूर यांची खत व्यवस्थापन, हळद वरील करपा नियोजन व इतर सर्व प्रश्नांचे निरासन संलग्न तज्ञांकडून करण्यात आले. बैठकीस उपस्थित सर्व शेतकऱ्यांना ट्रायकोडर्मा व जिवामृत वाटप करण्यात आले.

या बैठकीमध्ये मनोगत करताना श्री. शिवाजीराव गडदे (हत्ता नाईक) यांनी कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर, कृषि विस्तार उपक्रमाच्या अंतर्गत कृषि विज्ञान मंडळाची बैठककी मध्ये मिळालेल्या मार्गदर्शन सध्यास्थिति खूप गरजेचे आहे व या महिती चा प्रसार व प्रचार गावामध्ये करू असे त्यांनी संगितले . श्री. रवी मुंडे (हिवरा) यांनी कृषि विज्ञान मंडळानी गावचा विकास होईल व शेती निगडीत समस्याच निरासण करण्यास मदत मिळेल या विस्तार उपक्रमानी हिंगोली जिल्हायला एक नवीन दिशा मिळेल व डॉ. पी. पी. शेळके व डॉ. अतुल मुराई यांच्या परिश्रमाने हा उपक्रम गावचा विकास करण्यास अत्यंत फायदेशीर राहील असे सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विजय ठाकरे (कार्यालयीन अधीक्षक), श्री. शिवलिंग लिंगे, प्रक्षेत्र व्यवस्थापक सौ. मनीषा मुंगल, संगणक तज्ञ , श्री. गुलाबराव सूर्यवंशी, श्री. संतोष हाणवते, श्री. प्रेमदास जाधव यांचे मोलाचे योगदान लाभले व त्याच बरोबर शेख आफ्रिन, साई आणि मारोती कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या बैठकी मध्ये कृषि विज्ञान मंडळाचे प्रतींनिधी यामध्ये हत्ता नाईक, कोठारी, हिवरा, ताकतोडा, भोसी, खांबाळा, जामगव्हान, भोसी, पुयणी, गणेशपूर, वारंगा, तोंडापुर तांडा, चुंचा, धानोरा, मुंढल, शेंनोडी, दात्ती, वरुड, भाटेगाव, शिवणी बू, पोटा, इंचगाव, महिसगवाहन व वाई गावातील सदस्य उपस्थित होते. या कृषि विस्तार उपक्रमाच्या बैठकीचे आयोजन, सूत्रंसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अतुल मुराई विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) यांनी केले. 

टॅग्स :शेतीशेतकरीसरकारहिंगोली