Lokmat Agro >शेतशिवार > परभणी कृषि विद्यापीठ विकसित रबी पिकांच्या वाणांची बियाणे विक्री १७ सप्टेंबरला सुरु होणार

परभणी कृषि विद्यापीठ विकसित रबी पिकांच्या वाणांची बियाणे विक्री १७ सप्टेंबरला सुरु होणार

Seed sale of Rabi crop varieties developed by Parbhani Agricultural University will be launched on September 17 | परभणी कृषि विद्यापीठ विकसित रबी पिकांच्या वाणांची बियाणे विक्री १७ सप्टेंबरला सुरु होणार

परभणी कृषि विद्यापीठ विकसित रबी पिकांच्या वाणांची बियाणे विक्री १७ सप्टेंबरला सुरु होणार

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे संयुक्त विद्यमाने रबी पिक परिसंवादाचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि हे राहणार असून मुख्य अतिथी म्हणून ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनचे माजी उप महासंचालक माननीय डॉ. अनिल कुमार सिंह आणि विशेष अतिथी आहेत.

तसेच बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथील सनशाईन व्हिजीटेबल प्रा.लि.चे संचालक माननीय कर्नल सुभाष दैशवाल हे उपस्थित राहणार आहेत. शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

परिसंवादात रबी पिक लागवड, पिकावरील कीड-रोग व्यवस्थापन आदी विषयावर विद्यापीठ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सदर परिसंवादास जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.

तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी द्वारा विकसित रबी पिकांच्या वाणांचे बियाणे विक्रीचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आयोजित रबी पीक परीसंवादापासून होणार आहे.

ज्वारी

वाणउपलब्धताबियाणे पिशवी वजनकिंमत
परभणी शक्ती२० क्विंटल४ किलो५००
सुपर मोती२४ क्विंटल४ किलो५००
परभणी मोती४२ क्विंटल४ किलो५००
परभणी ज्योती८ क्विंटल४ किलो५००
हुरड्याचा परभणी वसंत४ क्विंटल१ किलो१५०

हरभरा

वाणउपलब्धताबियाणे पिशवी वजनकिंमत
बीडीएनजीके ७९८५.५० क्विंटल१० किलो१०००
बीडीएनजी ७९७४० क्विंटल१० किलो९००
फुले विक्रम९० क्विंटल१० किलो९००

करडई

वाणउपलब्धताबियाणे पिशवी वजनकिंमत
पीबीएनएस १५४१५ क्विंटल५ किलो५५०
पीबीएनएस १८४५ क्विंटल५ किलो५५०
पीबीएनएस १२३० क्विंटल५ किलो५५०
पीबीएनएस ८६३० क्विंटल५ किलो५५०
पीबीएनएस ४०१० क्विंटल५ किलो५५०

गहू

वाणउपलब्धताबियाणे पिशवी वजनकिंमत
एनआयएडब्ल्यू १९९४३० क्विंटल४० किलो२०००
एनआयएडब्ल्यू ३०११२ क्विंटल४० किलो२०००
एनआयएडब्ल्यू १४१५१० क्विंटल४० किलो२०००

जवस
जवसाचा एलएसएल ९३ (१९ क्विंटल) हा वाण उपलब्ध असून ५ किलोची बॅग ६५० रुपये आणि २ किलोची बॅग २६० रुपये दरानुसार उपलब्ध आहे. 

याप्रमाणे एकूण ३९४.५० क्विंटल बियाणे रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना खरेदीसाठी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले आहे.

Web Title: Seed sale of Rabi crop varieties developed by Parbhani Agricultural University will be launched on September 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.