मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे संयुक्त विद्यमाने रब्बी पिक परिसंवादाचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे.
परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि हे राहणार असून मुख्य अतिथी म्हणून ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनचे माजी उप महासंचालक माननीय डॉ. अनिल कुमार सिंह आणि विशेष अतिथी आहेत.
तसेच बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथील सनशाईन व्हिजीटेबल प्रा.लि.चे संचालक माननीय कर्नल सुभाष दैशवाल हे उपस्थित राहणार आहेत. शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
परिसंवादात रब्बी पिक लागवड, पिकावरील कीड-रोग व्यवस्थापन आदी विषयावर विद्यापीठ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सदर परिसंवादास जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.
तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी द्वारा विकसित रब्बी पिकांच्या वाणांचे बियाणे विक्रीचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आयोजित रबी पीक परीसंवादापासून होणार आहे.
ज्वारी
वाण | उपलब्धता | बियाणे पिशवी वजन | किंमत |
परभणी शक्ती | २० क्विंटल | ४ किलो | ५०० |
सुपर मोती | २४ क्विंटल | ४ किलो | ५०० |
परभणी मोती | ४२ क्विंटल | ४ किलो | ५०० |
परभणी ज्योती | ८ क्विंटल | ४ किलो | ५०० |
हुरड्याचा परभणी वसंत | ४ क्विंटल | १ किलो | १५० |
हरभरा
वाण | उपलब्धता | बियाणे पिशवी वजन | किंमत |
बीडीएनजीके ७९८ | ५.५० क्विंटल | १० किलो | १००० |
बीडीएनजी ७९७ | ४० क्विंटल | १० किलो | ९०० |
फुले विक्रम | ९० क्विंटल | १० किलो | ९०० |
करडई
वाण | उपलब्धता | बियाणे पिशवी वजन | किंमत |
पीबीएनएस १५४ | १५ क्विंटल | ५ किलो | ५५० |
पीबीएनएस १८४ | ५ क्विंटल | ५ किलो | ५५० |
पीबीएनएस १२ | ३० क्विंटल | ५ किलो | ५५० |
पीबीएनएस ८६ | ३० क्विंटल | ५ किलो | ५५० |
पीबीएनएस ४० | १० क्विंटल | ५ किलो | ५५० |
गहू
वाण | उपलब्धता | बियाणे पिशवी वजन | किंमत |
एनआयएडब्ल्यू १९९४ | ३० क्विंटल | ४० किलो | २००० |
एनआयएडब्ल्यू ३०१ | १२ क्विंटल | ४० किलो | २००० |
एनआयएडब्ल्यू १४१५ | १० क्विंटल | ४० किलो | २००० |
जवसजवसाचा एलएसएल ९३ (१९ क्विंटल) हा वाण उपलब्ध असून ५ किलोची बॅग ६५० रुपये आणि २ किलोची बॅग २६० रुपये दरानुसार उपलब्ध आहे.
याप्रमाणे एकूण ३९४.५० क्विंटल बियाणे रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना खरेदीसाठी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले आहे.