Lokmat Agro >शेतशिवार > Seed Seeling : बियाणे विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना आता 'साथी' पोर्टल आवश्यक

Seed Seeling : बियाणे विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना आता 'साथी' पोर्टल आवश्यक

Seed Seeling Sellers now need SATHI portal to sell seeds maharashtra agriculture department | Seed Seeling : बियाणे विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना आता 'साथी' पोर्टल आवश्यक

Seed Seeling : बियाणे विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना आता 'साथी' पोर्टल आवश्यक

Sathi Portal Seed Selling : कृषी विभागाकडून सर्व बियाणे विक्रेते आणि वितरकांना यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व विक्रेत्यांना या पोर्टलचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Sathi Portal Seed Selling : कृषी विभागाकडून सर्व बियाणे विक्रेते आणि वितरकांना यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व विक्रेत्यांना या पोर्टलचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Seed Selling SATHI Portal : कृषी विभागाने राज्यातील सर्व बियाणे उत्पादक आणि निविष्ठा विक्रेत्यांना साथी या पोर्टलचा वापर करणे बंधनकारक केले आहे. बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले असून याच पोर्टलवरून बियाण्यांचे वितरण आणि विक्री करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

दरम्यान, केंद्र शासनाने प्रमाणित बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्री पर्यंतच्या संनियंत्रणासाठी SATHI (Seed Authentication, Traceability and Holistic Inventory) पोर्टल विकसित केले आहे. तर यंदाच्या खरीप हंगामामध्ये साथी पोर्टल वरून प्रमाणित बियाणे विक्री/वितरण करणे अनिवार्य आहे.

कसे वापरावे साथी पोर्टल?
साथी पोर्टलचे लॉगिन आयडी व पासवर्ड सर्व बियाणे उत्पादक व निविष्ठा विक्रेते यांना देण्यात आले असून पहिल्या वेळी https://seedtrace.gov.in पोर्टल वरून login करावे व profile अद्यावत करावे. तदनंतर मोबाइल अॅप्लिकेशन चा वापर करून बियाणे विक्री करता येईल. साथी (SATHI) पोर्टल वरून बियाणे विक्री बाबतचे प्रशिक्षण सर्व जिल्ह्यांमध्ये निविष्ठा विक्रेते यांना देण्यात आले आहे.

साथी फेज-2 अंतर्गत बियाणे उत्पादक कंपनी व निविष्ठा विक्रेते यांनी प्रमाणित बियाणे विक्री/वितरण साथी पोर्टल वरून करावी. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे उत्पादनापासून अंतिम ग्राहका (शेतकरी) पर्यंत बियाणे वितरणाची माहिती मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण बियाणे वितरित होणार आहे. साथी पोर्टल वरून बियाणे विक्री केल्यास बियाण्याची उपलब्धता व वितरणाची सद्यस्थिती मिळणार आहे. 

तरी केंद्र शासनाकडून साथी फेज-2 च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत पाठपुरावा सुरू असून बियाणे उत्पादक कंपनी व निविष्ठा विक्रेते यांनी प्रमाणित बियाणे विक्री/वितरण साथी पोर्टल वरून करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. 

Web Title: Seed Seeling Sellers now need SATHI portal to sell seeds maharashtra agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.