Join us

Agriculture Drone युवा शेतकरी गटास ड्रोन फवारणीद्वारे स्वंयरोजगाराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 12:22 PM

कृषि क्षेत्रात शेतकऱ्यांना फवारणी वरील खर्च व वेळ वाचवावा याकरीता ड्रोनचा वापर करून विविध पिकातील किड व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन यासाठी भाडेतत्वावर ड्रोन उपलब्ध व्हावेत.

कृषि क्षेत्रात शेतकऱ्यांना फवारणी वरील खर्च व वेळ वाचवावा याकरीता ड्रोनचा वापर करून विविध पिकातील किड व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन यासाठी भाडेतत्वावर ड्रोन उपलब्ध व्हावेत व त्याची निगराणी व दुरूस्त तसेच शेतकरी युवा पिढीस स्मार्ट व प्रगतशील तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील कामे व स्वयंरोजगार निर्मीती करता यावी या दृष्टीकोनातुन वनामकृविचे मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वॉव गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) संस्थाचे संचालक श्री. शंकर गोयंका यांच्या सोबत दि. ०६ मे रोजी सामंजस्य करार करण्यात आला.

सदर करारामुळे वनामकृवि परभणी व  वॉव गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) यांचे संयुक्त विद्यमाने कृषी क्षेत्रात भाडेतत्वावर फवारणी करीता ड्रोनची  उपलब्धतता होणार आहे. या सामंजस्य करारानुसार शेतकरी, विदयार्थी, शास्त्रज्ञ यांना अधिकृत ड्रोन प्रशिक्षण सुविधा देण्यात येणार आहे.

या सामजस्य करारावर विद्यापीठातर्फे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी व डॉ. विशाल इंगळे तसेच वॉव गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) द्वारा संचालक शंकर गोयंका, त्यांचे सहयोगी राहुल मगदुम, गंगाधर कोल्हे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या प्रसंगी संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण कापसे व प्रगतशील शेतकरी मंगेश देशमुख, पेडगावकर, सचिन शेळके, पारवा, सचिन देशमुख, पिंपरीकर यांची उपस्थिती होती.

या करारामुळे शेतकऱ्यांना भाडेतत्वावर ड्रोन आधारित शास्त्रशुद्ध पद्धतीने फवारणी करणे सुलभ होईल. आणि युवा शेतकरी गटास ड्रोन फवारणीद्वारे स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध होईल असे मत मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले.

तसेच अल्पभुधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे हेतुस या सामंजस्य कराराद्वारे प्रयत्न करण्यात येवून शेतकऱ्यांना शेतीतील कामासाठी फवारणीमुळे भाडेतत्वावर ड्रोन उभारणी क्रेंद्राचा आर्थिकदृष्टया फायदा होईल अशी आशा व्यक्त केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा आम्ही प्रशिक्षण व शेतीसाठी नक्कीच उपयोग करून घेऊ याबाबत तत्परता दाखवली.

अधिक वाचा: पदवीधरांसाठी सुरु होतोय कृषी ड्राेन अभ्यासक्रम, कुठे व कधी होणार सुरुवात?

टॅग्स :शेतीपीककीड व रोग नियंत्रणवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणीशेतकरी