सागर कुटे
विदर्भ म्हटले की, पारंपरिक कापूस, सोयाबीन, तूर ही पिके घेण्यात अग्रेसर असा प्रांत. परंतू आता येथील शेतकऱ्यांनी रेशीम कोषाच्या (Silk Fund Production) शेतीचा पर्याय स्वीकारला आहे. या शेतीमुळे आर्थिक विकास साधता येत असल्याने, दरवर्षी क्षेत्राच्या वाढीबरोबर उत्पादनातही वृद्धी होत आहे.
मागील दीड वर्षांत राज्यात १९,२१४ एकर क्षेत्रावर ४,४२० मेट्रिक टन रेशीम कोष (Silk Fund Production) उत्पादन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 'जे विकता येईल तेच पिकवायचं' हे सूत्र आत्मसात केल्याचे दिसून येत आहे.
राज्यात रेशीम शेतीचा प्रारंभ पाच दशकांपूर्वी झाला. आजवर जवळपास २८ जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात रेशीम शेती (Sericulture Farming) केली जाते. रेशीम शेती अत्यंत कमी पाण्यावर केली जाऊ शकते, हे लक्षात घेत शेतकरी त्याकडे वळल्याचे दिसून येते.
मराठवाड्यानंतर विदर्भातही रेशीम उद्योगाला चांगली गती मिळत आहे. रेशीम तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्या शेतकऱ्यांकडून दरवर्षी चांगले उत्पन्न मिळवले जात आहे आणि हा उद्योग शेतकऱ्यांसाठी एक तारणहार ठरला आहे. (Sericulture Farming)
चॉकी सेंटरकडून अंडीपुंज वाटप
मागीलवर्षी राज्यातील १६८ चॉकी सेंटरकडून ५१ लाख ४० हजार अंडीपुंज वाटप करण्यात आले. एप्रिल २०२२ पासून ऑक्टोबरपर्यंत २८ लाख ३७ हजार अंडीपुज वाटप केल्याची माहिती आहे. यंदाही ६० लाख ८ हजार ८० हजार अंडीपुंज वाटप करण्यात आले आहे.
सुतापासून तयार होतात पैठणी, शालू
रेशीम कोषापासून ((Silk Fund Production) ) कच्चे रेशीम सूत तयार करण्यात येते. बाजारात वेगळ्या वेगळ्या डॅनियरमध्ये उपलब्ध असते. रेशीम सुतापासून पैठणी, शालू, साड्या आदी प्रकारचे रेशमी कापड होते. त्याकरिता कच्च्या रेशीम सुतावर विविध प्रक्रिया कराव्या लागतात. राज्यात मोठ्या प्रमाणात सूत निर्मिती झाल्याची माहिती रेशीम संचालनालयाकडून मिळाली.
असे झाले उत्पादन
राज्यात ४ हजार १० मेट्रिक टन कोष उत्पादन झाले. यामध्ये नागपूरमध्ये ५६.२८६, अमरावती ३२७.६४९, छत्रपती संभाजीनगर २३२५, पुणे विभागात १३०१ मेट्रिक टन कोष उत्पादन झाले.
एकवेळ रेशीमचे तंत्र विकसित झाले तर भरघोस उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे मला आर्थिक उन्नती साधता आले. केवळ अनुदानासाठी ही शेती नाही. - देवराव लाहोळे, रेशीम उत्पादक शेतकरी
हे ही वाचा सविस्तर : Summer Chilli : उन्हाळी मिरची लागवड करताय 'हे' नक्की वाचा