धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात तुती लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी रेशीम (silk) उत्पादनाचा स्वीकारला मार्ग आहे. थोडेथोडके नव्हे, तर जवळपास साडेचौदाशे एकर क्षेत्रावर तुतीची लागवड झाली असून, यंदा मार्चअखेरपर्यंत शेतकऱ्यांनी ६२३ मेट्रिक टन रेशीम उत्पादित केला आहे. (Sericulture Farming)
४ लाखांवर अनुदान...
'मनरेगा'मधून रेशीम शेती करता येते. या योजनेतून लागवडीपासून ते उत्पादन हाती येईपर्यंत कुशल, अकुशल कामांद्वारे ४ लाख १८ हजार रुपये अनुदान मिळते. दरम्यान, मजुरीचे दर वाढले असल्याने अनुदानही वाढू शकते. केंद्राच्या समग्र योजनेतून अनुदान मिळवून रेशीम शेती करता येऊ शकते. ०१ हजार ४३३ शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ घेत आर्थिक प्रगती साधली आहे.
१४५३ एकर क्षेत्रावर तुती...
धाराशिव जिल्ह्यात १ हजार ४३३ शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेत १ हजार ४५३ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली आहे. वरचेवर या क्षेत्रामध्ये नव्याने भर पडू लागली आहे.
तीन तालुक्यांत अधिक क्षेत्र
जिल्ह्यातील सर्वाधिक तुती लागवड ही भूम, वाशी व कळंब तालुक्यात झाली आहे. या भागातील क्षेत्र लक्षात घेता तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी रेशीम बाजारपेठ कळंब येथे विकसित करण्यासाठी प्रयत्न केले होते.
१५ वर्षांपर्यंत उत्पादन...
तुतीच्या झाडाचे आयुर्मान हे जवळपास १५ वर्षांचे असते. लागवडीनंतरचा सुरुवातीचा काही काळ वगळता झाडे जगेपर्यंत शेतकऱ्यांना रेशीम उत्पादित करता येऊ शकतो. यातून चांगले आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडत असल्याने आर्थिक उन्नती होण्यास मदत होते.
रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना विविध टप्प्यांवर मनरेगातून अनुदान मिळते. खर्चाचा बहुतांश वाटा योजनेतून मिळत असल्याने शेतकरी तुती लागवडीकडे वळले आहेत. यंदा मार्चअखेरपर्यंत ६२३ मेट्रिक टन उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. - आरती वाकुरे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी