Lokmat Agro >शेतशिवार > पाणीटंचाईचे भीषण संकट; या चार जिल्ह्यांतील १४४ प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा

पाणीटंचाईचे भीषण संकट; या चार जिल्ह्यांतील १४४ प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा

severe crisis of water scarcity; 40 percent water storage in 144 projects in these four districts | पाणीटंचाईचे भीषण संकट; या चार जिल्ह्यांतील १४४ प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा

पाणीटंचाईचे भीषण संकट; या चार जिल्ह्यांतील १४४ प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा

मराठवाड्यातील या चार जिल्ह्यांमधील लहान मोठ्या १४४ प्रकल्पांमध्ये केवळ ४० टक्के पाणी शिल्लक

मराठवाड्यातील या चार जिल्ह्यांमधील लहान मोठ्या १४४ प्रकल्पांमध्ये केवळ ४० टक्के पाणी शिल्लक

शेअर :

Join us
Join usNext

नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, हिंगोली, यवतमाळ व परभणी जिल्ह्यातील लहान-मोठ्या १४४ प्रकल्पांमध्ये आजघडीला ११०४.५६ दलघमी म्हणजे ४०.१४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने भूगर्भातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे.

वाढत्या तापमानाने धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने एप्रिल अखेर तसेच मे महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यातील एकूण १०४ प्रकल्पांची पूर्णजल क्षमता आहे, ज्यात आता ८०६.६४ दलघमी  पाण्याची क्षमता आहे. सद्यःस्थितीला २५०.४२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ३४.३९ इतकी आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ३१ प्रकल्पांची पूर्ण जलक्षमता आहे. ज्याची क्षमता १२४९.६९ दलघमी असून सध्या ३५४.३० दलघमी पाणीसाठा आहे. तर ३६.३९% पाणीसाठा उपलब्ध आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणाची एकुण जलक्षमता १२७९ दलघमी आहे. जिथे सध्या ४९४.७९ दलघमी पाणीसाठा असून, ५१.३२ उपयुक्त पाणीसाठा आहे.

परभणी जिल्ह्यातील आठ प्रकल्पांची जलक्षमता ११२.४५ दलघमी आहे. जिथे १४.०५ दलघमी म्हणजे सध्या १२.८२ टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे.

Web Title: severe crisis of water scarcity; 40 percent water storage in 144 projects in these four districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.