Lokmat Agro >शेतशिवार > Shet Jamin Mojani : शेत जमीन मोजणीच्या दरात झाली वाढ; कोणती मोजणी किती रुपयांत वाचा सविस्तर

Shet Jamin Mojani : शेत जमीन मोजणीच्या दरात झाली वाढ; कोणती मोजणी किती रुपयांत वाचा सविस्तर

Shet Jamin Mojani : The rate of agricultural land survey has increased read in detail | Shet Jamin Mojani : शेत जमीन मोजणीच्या दरात झाली वाढ; कोणती मोजणी किती रुपयांत वाचा सविस्तर

Shet Jamin Mojani : शेत जमीन मोजणीच्या दरात झाली वाढ; कोणती मोजणी किती रुपयांत वाचा सविस्तर

Shet Jamin Mojani शासनाने शेतजमीन आणि प्लॉटमोजणी शुल्कात सरासरी दुपटीने वाढ केली आहे.

Shet Jamin Mojani शासनाने शेतजमीन आणि प्लॉटमोजणी शुल्कात सरासरी दुपटीने वाढ केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : शासनाने शेतजमीन आणि प्लॉटमोजणी शुल्कात सरासरी दुपटीने वाढ केली आहे. लाडकी बहीण, भाऊ अशा लोकप्रिय योजनांमुळे शासनाच्या तिजोरीत खड्डा पडल्याने मोजणीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशाला जादाची कात्री लावली गेली आहे.

परिणामी मोजणीचा खर्च न परवडणाऱ्यांना हद्दीसाठी भांडणतंटे करीत बसण्याची वेळ येणार आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शासनाने लोकप्रिय योजनांचा सपाटा लावला.

त्याचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. त्याची भरपाई करण्यासाठी शासन आता विविध शासकीय शुल्कांत जबर वाढ करीत आहे. शंभर, २०० रुपयांचे मुद्रांक बंद करून ते थेट ५०० रुपये केले.

आता शेतजमीन, प्लॉटमोजणीच्या शुल्कातही घसघशीत वाढ केली आहे. नवीन दरवाढीच्या अंमलबजावणीत या महिन्यापासून होणार आहे. त्यामुळे जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

शेतजमीन मोजणीचे दर Shet Jamin Mojani Fee

मोजणीचा प्रकारजुने दरनवीन दर
साधी मोजणी१०००२०००
जलदगती मोजणी३०००८०००

मोजणीचे अधिकार कोणाकोणाला?
शेतजमीन, प्लॉटमोजणीचे अधिकार भूमी अभिलेख विभागाला आहेत. या विभागाकडे मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

मोजणीचे आता दोनच प्रकार
साधी, तातडीची, अतितातडीची असे मोजणीत तीन प्रकार होते. आता साधी आणि जलदगतीची मोजणी असे दोनच प्रकार केले आहेत.

दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असल्यास?
दोन हेक्टरपर्यंत साध्या मोजणीसाठी दोन हजार आणि दोन हेक्टरवर पुन्हा दोन हेक्टर असेल तर पुन्हा दोन हजार किंवा दोन हेक्टरपेक्षा कमी असेल तर एक हजार रुपये भरावे लागणार आहे. असेच शुल्काचे प्रमाण जलदगती मोजणीसाठीही आहे.

व्यावसायिक भूखंड मोजणीचे दर
एक सर्व्हे नंबर, गट नंबर, पोटहिस्से, प्लॉट, मंजूर रेखांकनातील एका भूखंडासाठी एक हेक्टरपर्यंत पूर्वी एक हजार रुपये साधीसाठी आणि अतितातडीसाठी ३ हजार रुपये भरावे लागत होते. आता साधीसाठी ३ हजार रुपये, तर जलदगती मोजणीसाठी १२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

मनपा हद्दीतील क्षेत्राचा मोजणी दर अधिक
महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील भूखंडाच्या मोजणीसाठी पूर्वी दोन हजार आणि जलदगतीसाठी सहा हजार, तर नव्या दरानुसार साध्यासाठी तीन हजार जलदगती मोजणीसाठी १२ हजार रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

Web Title: Shet Jamin Mojani : The rate of agricultural land survey has increased read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.