Join us

Shetmal Kharedi: हमीभावाने खरेदीसाठी ज्वारी, बाजरी व मक्याची ऑनलाइन नोंदणी सुरू; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:39 IST

Shetmal Kharedi: केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत अन्नधान्य महामंडळामार्फत शेतकऱ्यांकडून ज्वारी, बाजरी व मक्याची (jowar, millet and maize) हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी (Online registration) सुरू करण्यात आली आहे. जाणून घ्या काय आहे शेवटची तारिख. (Shetmal Kharedi)

अकोला : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत अन्नधान्य महामंडळामार्फत शेतकऱ्यांकडून ज्वारी, बाजरी व मक्याची (jowar, millet and maize) हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. (Shetmal Kharedi)

नाफेड (NAFED) अंतर्गत ही खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.  यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाइन नोंदणी (Online registration) पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे.  

अकोला जिल्ह्यातील बाळापूर, कवठा, निंबा फाटा, कान्हेरी गवळी, तेल्हारा, अकोट, मुंडगाव अकोला, लाखनवाडा, मूर्तिजापूर, पातूर, आलेगाव व बार्शीटाकळी येथील खरेदी केंद्रावर ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी (Online registration) करता येणार आहे. (Shetmal Kharedi)

खरेदी १ मे ते ३० जूनदरम्यान करण्यात येणार आहे. संकरित ज्वारीचा हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ३७१ रु. असून, मालदांडी ज्वारीचा हमीदर ३ हजार ४२९ रु. आहे. मक्याचा हमीभाव प्रतिक्विंटल २ हजार २२५ रु. असून, बाजरीचा हमीभाव प्रती क्विंटल २ हजार ६२५ रु. आहे.   (Shetmal Kharedi)

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी पोर्टलवर एनईएमएल पोर्टलवर (NeML Portal) करण्यासाठी शेतकऱ्यांचा पिकाचा उल्लेख असलेला सातबारा उतारा आधारपत्राची प्रत, आधार जोडणी असलेले बँक खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक, शेतकऱ्याचा फोटो आवश्यक आहे.

पावती जपून ठेवा

शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यावर पावती (receipt) जपून ठेवावी.

कशासाठी ही नोंदणी?

केंद्र सरकार ज्वारी, बाजरी आणि मका यांसारखी पिके हमीभावाने खरेदी करते, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी चांगला दर मिळतो.

मदतीचा मार्ग

या योजनेमुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादनाचे नुकसान झाल्यास मदतीसाठी एक मार्ग उपलब्ध होतो.

उत्पादन खर्च

हमीभावाने खरेदी केल्याने, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो, ज्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळतो.

हे ही वाचा सविस्तर  : Pik Vima: शासनाच्या एक रुपयात पीक विमा योजनेचे वास्तव जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमकाज्वारीबाजरीशेतकरीशेती