Join us

Shetmal Taran Yojana : दर कमी आहे तर सोयाबीन विकू नका; शेतमाल तारण अंतर्गत कर्ज मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 3:41 PM

अतिवृष्टीने सोयाबीन पिकाची नासाडी झाली आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनची प्रत खालावली आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी मालाची जास्त आवक झाल्याने शेत मालाचे भाव व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक पाडल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तारण योजनेंतर्गत कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई टाळावी, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.

खामगाव : अतिवृष्टीने सोयाबीन पिकाची नासाडी झाली आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनची प्रत खालावली आहे.

अशा परिस्थितीत काही ठिकाणी मालाची जास्त आवक झाल्याने शेत मालाचे भाव व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक पाडल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तारण योजनेंतर्गत कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई टाळावी, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.

काही दिवस प्रतीक्षा केल्यास शेतकऱ्यांना जादा भाव मिळेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

शेतमालास जादा भाव मिळू शकतो!

बाजार समितीत मालाची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यानंतर दर घसरतात. हा शेतमाल साठवणूक करून काही काळ राहत असल्याने नंतर भाव मिळते.

खुल्या बाजारातच होते सोयाबीनची विक्री

• बुलढाणा जिल्ह्यात ११ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्या अंतर्गत उपबाजार समित्या सुद्धा आहेत. या ठिकाणी सर्वाधिक शेतमालाची खरेदी केली जाते.

• जिल्ह्यात दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील पीक खरेदीसाठी हमीभाव केंद्र शासनातर्फे सुरू केले जातात. त्यामुळे अनेक शेतकरी याच हंगामात शेतमाल विकतात.

• रब्बी हंगामातील कडधान्य पिकाची विक्रीसुद्धा खुल्या बाजारातच शेतकरी करीत असल्याने कृउबास मध्ये माल विक्रीसाठी नेला जात नाही.

सहा टक्के व्याज

शेतमाल तारण योजनेत ६ टक्के व्याज दराने तारण कर्ज सहा महिने कालावधीसाठी दिले जाते. सहा महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना ३ टक्के व्याजाची सवलत मिळत असते.

प्रतिसादाचा अडथळा !

शेतमाल तारण योजनेला बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ही योजना सध्यातरी जिल्ह्यात कुचकामी ठरत असल्याचे दिसते.

काय आहे शेतमाल तारण योजना?

कृषी पणन मंडळ १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवीत आहे. सदर योजनेंतर्गत बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्केपर्यंत रक्कम सहा महिने कालावधीसाठी सहा टक्के व्याज दराने तारण कर्ज म्हणून देण्यात येते.

हेही वाचा : Rajma Farming : मराठवाड्याच्या शेतीचा गेम चेंजर 'राजमा'; शेतकऱ्यांनी रब्बीतील क्रॉप पॅटर्न बदलला

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारसोयाबीनमार्केट यार्ड