Join us

Shevga Export : पंढरपूर तालुक्यामधील शेतकरी महिला गटाचा शेवगा दुबईला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 09:06 IST

महिलांचे बचत गट व शेतकरी गट तयार करून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामधील शिवस्वराज्य शेतकरी महिला गटाने शेवग्याची लागवड केली होती.

पंढरपूर तालुक्यामधील शिवस्वराज्य शेतकरीमहिला उत्पादक गटाने दर्जेदार शेवग्याचे पीक घेतले आहे. दोन टन शेवगा शुक्रवारी दुबईला निर्यात केला.

ग्रामीण महिलांसाठी ही घटना मैलाचा दगड ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

महिलांचे बचत गट व शेतकरी गट तयार करून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामधील शिवस्वराज्य शेतकरी महिला गटाने शेवग्याची लागवड केली होती.

ग्रामीण भागातील मालाला विदेशी बाजारपेठअपेडा व एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज यांच्या पुढाकाराने हा शेवगा निर्यातीस सुरुवात केली आहे. उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर यांनी ही घटना उमेद अभियानासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला आता विदेशी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

अपेडाचे उप महाव्यवस्थापक नागपाल लोहकरे यांनी त्यांच्या विभागाकडून उमेद अंतर्गत ग्रामीण महिलांचा शेतमाल निर्यात होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यातील ग्रामीण महिलांना त्यांच्या हक्काची अंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी यापुढेही मदत सुरु राहील असे सांगितले.

एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे चेअरमन प्रवीण वानखडे यांनी राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता गट यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात शेतमाल बाहेरच्या देशात पाठविता येईल मात्र त्यासाठी शेतीमालाचा दर्जा सुद्धा सर्वोत्तम असावा लागेल.

भारतातील शेतीमालाला चांगली मागणी आहे, त्यासाठी चांगले निर्यातदार भेटणे आवशक आहे, या प्रकारचे निर्यातदार उपलब्ध करून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवस्वराज्य शेतकरी महिला उत्पादक गटाच्या अध्यक्ष श्रीमती कौशल्य शंकर जाधव म्हणाल्या की, आमच्या शेवग्याचे उत्पादन स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त दराने निर्यात होत असल्यामुळे आमच्या सर्व महिलांना खूप आनंद होत आहे, आम्ही आता आमच्या भागातील महिलांना निर्यात होऊ शकणाऱ्या शेती उत्पादनाचा आग्रह करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

यावेळी उमेदचे परमेश्वर राऊत, अपेडाचे नागपाल लोहकरे, धनवंत माळी, मंजिरी टकले, संदीप जठार, प्रवीण वानखडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा निर्यात सुरू होणार; यंदा कोणत्या देशात किती निर्यात?

टॅग्स :शेतकरीशेतीमहिलादुबईपीकपंढरपूरभाज्यामहाराष्ट्रशेतकरी यशोगाथा