केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेमध्ये जिल्ह्यातील तब्बल ८९०० मयत शेतकऱ्यांच्या नावावर अनुदानाची रक्कम जमा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली ई-केवायसी केली नसल्याने पीएम किसान योजनेतील हा गोंधळ पुढेआला आहे. एकीकडे पीएम किसानचा लाभ मिळण्यासाठी अल्पभूधारक, कास्तकारांची धडपड सुरू असताना दुसरीकडे मयत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ५ कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा होत असल्याचे समोर आले आहे.
पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अल्पभूधारक, कास्तकारांची धडपड सुरू असताना दुसरीकडे मृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा होत असल्याचे समोर आले आहे.
पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी आणि आधार सीडिंग करणे अनिवार्य आहे. वारंवार सूचना देऊनही अनेक जिल्ह्यात एकेवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. आधार लिंक न करणारे शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसान च्या सहा हजार रुपयांच्या यादीतून वगळले जाणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. 27 जुलै 2023 रोजी ८५ कोटी गुण अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये हस्तांतरित केले. या योजनेत 18000 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली, पण लाखो शेतकऱ्यांना एकेवायसी नसल्याने हप्ता मिळाला नाही. लाभ मिळवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांनाही केवायसी करण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा मुदत वाढ दिली आहे.
मयत लाभार्थ्यांचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन पीएम किसान योजनेच्या यादीतून वगळण्यासाठी पोर्टलवर अपलोड करून अपात्र लाभार्थी वगळण्याचे काम सुरू आहे. तसेच ज्या लाभार्थ्याने एकेवायसी केलेली नसेल त्यांनी तात्काळ एकेवायसी करून घ्यावी जेणेकरून पंधरावा हप्ता लवकरात लवकर मिळेल. - विजय बेतीवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी, नांदेड
तालुकानिहाय मयत शेतकरी संख्या
जिल्ह्यात पीएम किसान योजनेच्या यादीतील तालुकानिहाय मयत शेतकरी उमरी ३२६, नांदेड ५१६, माहूर ४८१, अर्धापूर ३१७, देगलूर १०४६, हदगाव ७१४, कंधार २६८, बिलोली ३९१, किनवट १४५३, भोकर ३५९, धर्माबाद २९०, नायगाव ५३३, मुखेड शेतकऱ्यांची संख्या आहे