Lokmat Agro >शेतशिवार > फळे अन भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवावा का?

फळे अन भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवावा का?

Should fruits and vegetables be kept in the fridge? | फळे अन भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवावा का?

फळे अन भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवावा का?

अनेक फळं जवळपास वर्षभर बाजारात उपलब्ध असतात, कारण हंगामात आलेली फळं मोठमोठे व्यापारी कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवतात. याशिवाय बाजारातून आणलेली भाजी कित्येक दिवस तशीच फ्रीजमध्ये ठेवली जाते.

अनेक फळं जवळपास वर्षभर बाजारात उपलब्ध असतात, कारण हंगामात आलेली फळं मोठमोठे व्यापारी कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवतात. याशिवाय बाजारातून आणलेली भाजी कित्येक दिवस तशीच फ्रीजमध्ये ठेवली जाते.

शेअर :

Join us
Join usNext

प्रत्येक फळांचा विशिष्ट हंगाम असतो आणि ती त्याच हंगामात खाल्ली तर चवीला चांगली लागतात. पण अनेक फळं जवळपास वर्षभर बाजारात उपलब्ध असतात, कारण हंगामात आलेली फळं मोठमोठे व्यापारी कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवतात. याशिवाय बाजारातून आणलेली भाजी कित्येक दिवस तशीच फ्रीजमध्ये ठेवली जाते. त्यामुळे फळे अन् भाजीपाला किती दिवस फ्रीजमध्ये ठेवावा? ठेवावा की ठेवू नये? याबाबतचा लोकमत ने घेतलेला हा आढावा.

फ्रीजमध्ये काय ठेवू नये?
फळ आणि भाजीपाल्यासाठी खुल्या हवेची गरज असते. त्यामुळे शक्यतो फळ अन् भाजीपाला जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नये. भाजीपाला आणि फळे एका ठिकाणी ठेवू नये. काही फळे व भाजीपाला हे येथिलीन उत्सर्जित करत असतात. त्यामुळे त्याचा उग्र वास येत असतो. फ्रीजमध्ये ठेवलेल्या फळांवर विविध रंगांचे डाग दिसायला लागतात. तसेच पेशींचे विघटन होऊन अनेक फळे आतून नरम पडतात व खाण्यायोग्य राहत नाहीत.

तापमान नियंत्रित ठेवा
अनेक वेळा फ्रीजमध्ये पदार्थ ठेवूनही ते सुकलेले असतात. पालेभाज्यांचा ताजेपणा टिकून राहत नसेल तर आपल्याला फ्रीजमधील तापमान नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. भाजीपाला थेट कप्प्यात ठेवण्या ऐवजी टिशू पेपर अथवा नॅपकिनवर पसरून ठेवावे. यामुळे अतिरिक्त तापमानामुळे ते व्यवस्थित राहतील.

फ्रीजमध्ये काय ठेवावे?
भाजीपाला आणि फळे एका ठिकाणी ठेवू नये. का फळे व भाजीपाला हे येथिलीन उत्सर्जित करत असतात. त्यामुळे त्याचा उग्र वास येत असतो. काकडी आणि बीन्स सारखे पदार्थ हलक्या कापडामध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावे. मुळा फ्रीजमध्ये ठेवण्याच्या पूर्वी त्याची पाने बाजूला करावीत, गाजर फ्रीजमध्ये ठेवताना त्याचा वरील भाग कापून टाकावा.

काय म्हणतात आहारतज्ज्ञ
आज प्रत्येकाच्या घरात फ्रीज आवश्यक बाब ठरली आहे. या फ्रीजचा वापर आपण फळे, भाजीपाला, अन्नपदार्थ ताजे रहावेत यासाठी करतो. खरेतर असे पदार्थ ताजेच खाणे चांगले असते. शिजवलेले अन्न तीन ते पाच दिवसांपेक्षा अधिक काळ आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू नये. एअर टाइट प्लास्टिक बॅग पदार्थ स्टोरेज करण्यासाठी वापरू नये असे आहारतज्ज्ञ सांगतात.

Web Title: Should fruits and vegetables be kept in the fridge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.