Join us

साहेब, आमचे काय चुकले; हिश्याची रक्कम भरूनही सौर कृषिपंप मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 9:45 AM

महाकृषी ऊर्जा अभियान कोलमडले; एजन्सीच्या मनावरच कारभार सुरू

मारोती जुंबडे

शेतकऱ्यांना सिंचनासाठी १२ तास विना अडथळा वीजपुरवठा व्हावा, यासाठी महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. मात्र, येथील प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ७७८३ शेतकऱ्यांपैकी १० जूनपर्यंत केवळ १८६६ शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळाला आहे.

त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची रक्कम भरूनही त्यांना सौर कृषिपंप मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. याकडे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी सौर कृषिपंप योजनेच्या माध्यमातून पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपी (अश्वशक्ती) तर पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ३ एचपी कृषिपंप देण्यात येत आहेत. पाच एचपी कृषिपंपाची किंमत ३ लाख ८५ हजार आहे.

तर, तीन एचपी कृषिपंपाची किंमत २ लाख ५५ हजार रुपये एवढी आहे. हे पंप घेण्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना कृषिपंपाच्या किंमतीच्या फक्त दहा टक्के आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कृषिपंपाच्या किंमतीच्या फक्त दहा टक्के आणि अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीच्या लाभर्थ्यांना केवळ पाच टक्के रक्कम भरवी लागत आहे. महावितरणतर्फे पुढील पाच वर्षांसाठी कृषिपंपाची देखभाल दुरूस्ती केली जाणार आहे. 

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतही ५० टक्के प्रस्ताव कंपनीकडून रद्द

२०१९ मध्ये सुरू झालेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना जिल्ह्यातील १३ हजार ७९९ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे आपले प्रस्ताव दाखल केले होते.

त्यापैकी वीज वितरण कंपनीच्या वतीने प्राप्त झालेल्या प्रस्तावांची पडताळणी करण्यात आली. पडताळणी केल्यानंतर जमीन नावावर नसणे, पाण्याची नोंद नाही, काही ठिकाणी चुकीच्या नोंदी असल्यावरून वीज वितरण कंपनीने प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी जवळपास ५० टक्के प्रस्ताव रद्द केले. त्यामुळे प्रस्ताव दाखल केलेले शेतकरी राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनेपासून वंचित राहिले.

साडेसात हजार जणांचा संयुक्त सर्वे

महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत भाग बी मध्ये ९८९१ शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यातील ९१२८ जणांना बी-१ व बी-२ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यापूर्वी सौर कृषिपंप देणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. विशेष म्हणजे ७३७२ जणांचा संयुक्त सर्वेही झाला.

ज्येष्ठता यादी डावलून लाभ?

● सौर कृषिपंपबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. खासदार संजय जाधव यांनी २० जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत याबाबत प्रश्न उपस्थित केला.

● महाकृषी ऊर्जा अभियानात ज्येष्ठता डावलून काही शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित करत जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मेडाअंतर्गत दिले पाच पंप

● शेतकऱ्यांना अधिकाधिक सौर कृषिपंप मिळावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असताना दुसरीकडे स्थानिक प्रशासन आपली उदासीन भूमिका समोर आणत आहे.

● मेडाअंतर्गत जिल्ह्यातील २१०८ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप मिळावा, यासाठी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यातील १५५८ शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली असून ११५८ शेतकऱ्यांनी आपल्या हिश्याची रक्कमही प्रशासनाकडे अदा केली.

● केवळ पाच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मेडाअंतर्गत सौर कृषिपंप बसविण्यात आले असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली. त्यामुळे हे अभियान शेतकऱ्यांच्या हिताचे असूनही लाभ देण्यासाठी मात्र कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येत आ

काही ठळक बाबीं

● परभणी जिल्ह्यामध्ये महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत जिल्ह्यातील ७७८३ १ शेतकयांनी या योजनेअंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केला होते. त्यापैकी ७५७० शेतकऱ्यांना मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे मंजुरी मिळालेल्या ७२७६ शेतकऱ्यांनी आपल्या हिश्याची रक्कमही प्रशासनाकडे अदा केली, त्यांपैकी ६६८८ शेतकऱ्यांचा संयुक्त सर्वेही झाला.

● या शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी त्यांच्या शेतात सौर कृषिपंप देणे अपेक्षित होते. परंतु कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे ते शक्य झाले नाही. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाचा प्रभावही या कंपन्यांवर होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ १८६६ शेतकऱ्यांनाच १० जूनपर्यंत सौर कृषिपंप देण्यात आला आहे.

● उर्वरित शेतकरी आजही आपल्या हिश्याची रक्कम भरूनही सौर। कृषिपंप कधी ३येणार यासाठी महावितरण प्रशासनाकडे येरझारा करत असल्याचे दिसून ये येत आहे. या अभियानाचा जिल्ह्यातील लेखाजोखा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन या अभियानाची गती वाढवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा - ढगफूटी होऊनही शेतात साचले नाही पाणी; बीबीएफ पद्धत शेतकरी बांधवांसाठी ठरतेय वरदान

टॅग्स :शेतीशेतकरीपीक व्यवस्थापनपाणीशेती क्षेत्र