Join us

Sitaphal farm : परिस्थिती आणि पिकांची सांगड घालत खेरडे यांना मिळाले लाखोंचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 3:55 PM

उत्पादन ते विक्री अशी सर्व बाजू सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला सेंद्रिय सीताफळ शेतीतून लखलाभ झाला आहे. वाचा सविस्तर (Sitaphal farm)

Sitaphal farm : 

चांदूर रेल्वे : उत्पादन ते विक्री अशी सर्व बाजू सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला सेंद्रिय सीताफळ शेतीतून लखलाभ झाला आहे.  त्यासाठी पूर्वनियोजन व धोका पत्करण्याची धमक या बाबी कारणीभूत ठरल्या. 

आता या शेतकऱ्याने अंजिराच्या शेतीचा ध्यास घेतला आहे. त्यांचे नावीन्यपूर्ण प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. चांदूर रेल्वे शहरातील युवराज खेरडे हे प्रगतशील शेतकरी असून त्यांच्याकडे २५ एकर शेती आहे.

२०१७ पर्यंत अन्य शेतकऱ्यांप्रमाणे ते कपाशी, सोयाबीन, तूर, हरभरा आदी पारंपरिक पिके घेत असत. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत एकरी उत्पन मिळत नव्हते. २०१६ मध्ये शिवाजी कृषी महाविद्यालयातील कार्यक्रमात सीताफळ लागवडीबाबत माहिती घेतली. 

२०१७ मध्ये दीड एकरावर ५५० झाडांची लागवड करण्यापूर्वी त्यांनी जळगाव येथे जैन हिल तसेच बंगळुरू येथील सीताफळ संशोधन लागवड केंद्र व संगारेड्डी (आंध्र प्रदेश) येथील सीताफळ संशोधन केंद्राला भेट देऊन माहिती घेतली व बारामती येथून वाणाची लागवड केली.

संपूर्ण कुटुंबाचा हातभारसीताफळातून पहिल्या वर्षी सव्वा लाखाचे उत्पन्न झाले. खर्च वजा जाता ७० हजारांचे निव्वळ उत्पन्न झाले. त्यामुळे हुरूप वाढून खेरडे यांनी २०२० मध्ये पुन्हा २५० झाडांची लागवड केली.

२०२४ मध्ये चार हजार किलो सीताफळाची सरासरी १०० रुपये किलो दराने पत्नी छाया खेरडे यांच्यासह या कुटुंबाने चांदूर रेल्वे-अमरावती रोडवर विक्री केली. त्यामुळे त्यांना ही सिताफळ लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी ठरली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रफळेलागवड, मशागतपीकशेतीशेतकरी