Lokmat Agro >शेतशिवार > Snake Bite : रब्बीच्या पिकांना रात्री पाणी भरत आहात का? तर 'अशी' काळजी घ्या; सर्पदंशाची शक्यता नाकारता येत नाही

Snake Bite : रब्बीच्या पिकांना रात्री पाणी भरत आहात का? तर 'अशी' काळजी घ्या; सर्पदंशाची शक्यता नाकारता येत नाही

Snake Bite : Watering Rabi crops at night? So take care 'like this'; The possibility of snakebite cannot be ruled out | Snake Bite : रब्बीच्या पिकांना रात्री पाणी भरत आहात का? तर 'अशी' काळजी घ्या; सर्पदंशाची शक्यता नाकारता येत नाही

Snake Bite : रब्बीच्या पिकांना रात्री पाणी भरत आहात का? तर 'अशी' काळजी घ्या; सर्पदंशाची शक्यता नाकारता येत नाही

सध्या जवळपास सर्वत्र रब्बीच्या (Rabi) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. याच बरोबर उष्णतेचा तडाखा (Heat Wave) देखील वाढला आहे. ज्यामुळे पिकांना (Crop) पाण्याची मोठी गरज भासते आहे. तर यंदा शेतीसाठी वीज मोफत असली तरी दरवर्षीप्रमाणे विजेचा लंपडाव देखील सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) नाईलाजाने गहू, हरभरा, मका पिकांना रात्री उशिरापर्यंत पाणी देणे लागते आहे. अशा परिस्थितीत अनावधानाने सर्पदंश (Snake Bite) होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या जवळपास सर्वत्र रब्बीच्या (Rabi) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. याच बरोबर उष्णतेचा तडाखा (Heat Wave) देखील वाढला आहे. ज्यामुळे पिकांना (Crop) पाण्याची मोठी गरज भासते आहे. तर यंदा शेतीसाठी वीज मोफत असली तरी दरवर्षीप्रमाणे विजेचा लंपडाव देखील सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) नाईलाजाने गहू, हरभरा, मका पिकांना रात्री उशिरापर्यंत पाणी देणे लागते आहे. अशा परिस्थितीत अनावधानाने सर्पदंश (Snake Bite) होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या जवळपास सर्वत्र रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. याच बरोबर उष्णतेचा तडाखा देखील वाढला आहे. ज्यामुळे पिकांना पाण्याची मोठी गरज भासते आहे. तर यंदा शेतीसाठी वीज मोफत असली तरी दरवर्षीप्रमाणे विजेचा लंपडाव देखील सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने गहू, हरभरा, मका पिकांना रात्री उशिरापर्यंत पाणी देणे लागते आहे. अशा परिस्थितीत अनावधानाने सर्पदंश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशावेळी सर्पदंश झाल्यानंतर अनेकजण घाबरून जातात. ज्यात अनेक भागात आजही साप चावल्यानंतर एखाद्या बुवा-बाबाकडे किंवा मांत्रिकाकडे विष उतरवण्यासाठी नेण्यात येते. मात्र, या प्रकारामुळे एखाद्या व्यक्तीचा जीवदेखील जाऊ शकतो. साप चावल्यानंतर मांत्रिकाकडे न जाता डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी देतात. 

सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचार

सर्पदंश झाल्यावर तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच कितीतरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत 'हा' उपचार अत्यंत महत्त्वाचा आहे. तो कसा कराल?

• सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा.
• सर्पदंश झालेल्या व्यक्तीला सर्वप्रथम जमिनीवर झोपवावे. कारण जर तो व्यक्ती चालत-फिरत असेल तर विष शरीरात लवकर पसरते.
• सर्पदंश झालेल्या व्यक्तीला घाबरवू नका, त्याला हिंमत द्या. कारण घाबरल्यानंतर रक्त्तप्रवाह वाढतो. अशाने शरीरात विष लवकर पसरते.
• सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पायी चालवीणे, जास्त बोलण्यास लावणे टाळावे.

सर्पदंश झाल्यास हे करू नका

दंश झालेल्या व्यक्तीला मांत्रिकाकडे न नेता तत्काळ दवाखान्यात न्यावे, कोणाही मांत्रिकाकडे नेऊ नका. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला कडूलिंबाचा पाला, मिरची खायला देऊ नका. यामुळे तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ वाया घालवता. तसे करू नका. दंश झालेल्या व्यक्तीला तत्काळ दवाखान्यात न्यावे. सर्पदंश झालेल्या जागेवर कोणतीही औषधी वनस्पती उगाळून लावू नका किंवा कोणत्याही बिया वगैरे खाण्यास देऊ नये. तसेच रुग्णाला बेशुद्ध होऊ देऊ नका.

सर्पदंश्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे

• जखमेच्या जागेवर दाताचे व्रण दिसतात.
• जखमेतून रक्त येते.
• चावा घेतलेल्या जागेवर किंवा अवयवावर सूज येते.
• प्रभावित जागेच्या रंगात फरक दिसतो.
• चक्कर येतात.
• खूप घाम येतो.
• हृदयाचे ठोके वाढतात.

सर्पदंश होऊ नये म्हणून शेतात काम करतांना हे करा 

• मोटार सुरू करतांना सरळ स्टार्टरच्या पेटीला हात लावणे टाळावे. आधी काठीने तिथे आवाज करून नंतर हाताने स्पर्श करावा. 
• रात्री पाणी भरतांनी स्वतः जवळ दूर पर्यंत प्रकाश जाईल अशी बॅटरी व एक मजबूत काठी बाळगावी. 
• गवताच्या पेंड्या उचलताना काळजी घ्यावी. तसेच अधिक गवत असलेल्या भागात आवाज करत जावे. 

हेही वाचा : Revenue Department : आता महसूल विभागात अव्वल कारकून, तलाठी पदनाम नाही; वाचा काय झालाय बदल

Web Title: Snake Bite : Watering Rabi crops at night? So take care 'like this'; The possibility of snakebite cannot be ruled out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.