Lokmat Agro >शेतशिवार > Solapur Dalimb : सोलापूर जिल्ह्यात फळबागांचा आकडा पोहोचला एक लाख हेक्टरपर्यंत

Solapur Dalimb : सोलापूर जिल्ह्यात फळबागांचा आकडा पोहोचला एक लाख हेक्टरपर्यंत

Solapur Dalimb : The number of orchards in Solapur district has reached one lakh hectares | Solapur Dalimb : सोलापूर जिल्ह्यात फळबागांचा आकडा पोहोचला एक लाख हेक्टरपर्यंत

Solapur Dalimb : सोलापूर जिल्ह्यात फळबागांचा आकडा पोहोचला एक लाख हेक्टरपर्यंत

सोलापूर जिल्ह्यात आंबा लागवड क्षेत्र वाढत असतानाच पेरूलाही शेतकरी प्राधान्य देत असल्याचे कृषी खात्याकडील नोंदीवरून दिसत आहे. जिल्ह्यात यंदाही आंब्यासह पेरूची लागवड सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यात आंबा लागवड क्षेत्र वाढत असतानाच पेरूलाही शेतकरी प्राधान्य देत असल्याचे कृषी खात्याकडील नोंदीवरून दिसत आहे. जिल्ह्यात यंदाही आंब्यासह पेरूची लागवड सुरू असल्याचे सांगण्यात आले.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : जिल्ह्यात आंबा लागवड क्षेत्र वाढत असतानाच पेरूलाही शेतकरी प्राधान्य देत असल्याचे कृषी खात्याकडील नोंदीवरून दिसत आहे. जिल्ह्यात यंदाही आंब्यासह पेरूची लागवड सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यात यंदाही शेतकऱ्यांचे फळबाग लागवडीला प्राधान्य असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अडीच हजार हेक्टर फळबाग लागवडीचा लक्ष्यांक असताना ५ हजार २३९ शेतकऱ्यांचे चार हजार १८३ हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज कृषी खात्याकडे आले आहेत.

चार हजार ७२७ शेतकऱ्यांच्या अर्जाना ३८२९ हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी मंजुरी दिली आहे. यंदा पाऊस भरपूर पडल्याने फळबागाचे क्षेत्र वाढणार आहे.

मात्र, उशिरापर्यंत पाऊस पडल्याने फळबागांसाठी खड्डे खोदणे व लागवडीसाठी उशीर होत आहे. मात्र, शेतकरी फळबाग लागवडीवर भर देताना दिसत आहे.

आतापर्यंत हजार हेक्टरवरील खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत. बावीस हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सतराशेहून अधिक हेक्टरवर विविध प्रकारच्या फळबागांची लागवड केली आहे. शेतकरी जमेल त्याप्रमाणे फळबागांचे क्षेत्र वाढवीत असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात सध्याच्या फळबाग क्षेत्राची आकडेवारी पाहिली असता आंब्याच्या क्षेत्रापेक्षा पेरूचे क्षेत्र अधिक दिसत आहे. जिल्ह्यात चार हजार ४२१ हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवडीची नोंद कृषी खात्याकडे आहे.

यापेक्षा अधिक म्हणजे पाच हजार २९७ हेक्टर क्षेत्रावर पेरू लागवड असल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षापर्यंतच्या अकडेवारीत आंब्यापेक्षा पेरू क्षेत्र अधिक असताना यंदाही पेरूचे क्षेत्र वाढत असल्याचे सांगण्यात आले.

९२ हजार हेक्टर फळबागा
जिल्ह्यात विविध प्रकारच्या ९२ हजार हेक्टर फळबागांचे क्षेत्र कृषी खात्याकडे नोंदले आहे. एकूण २१ हजार ६६६ हेक्टर क्षेत्रावर फळबागा नोंदल्या असल्या तरी त्यात यंदाच्या नव्याने झालेल्या लागवडीची भर पडत आहे. त्यामुळे फळबागांच्या क्षेत्रात आणखीन वाढ होत आहे. 

डाळिंब लागवड नंबर १
जिल्ह्यात केळी, डाळिंब व द्राक्षाचे ६७हजार हेक्टर क्षेत्र असल्याचे कृषी खात्याकडील आकडेवारीवरून दिसत आहे. यामध्ये डाळिंबाचे २८ हजार हेक्टरच्या जवळपास क्षेत्र आहे. एकवीस हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर केळी तर एकोणीस हजार हेक्टरवर द्राक्ष शेती असल्याचे दिसत आहे.

सोलापूर जिल्ह्यात फळबागांसाठी हवामान पोषक आहे. त्यामुळे फळबागांचे क्षेत्र शेतकरी करताना दिसत आहेत. पेरू, आंबा, सीताफळ, लिंबू, इत्यादींची लागवड करतातच. जिल्ह्यात ड्रगन फ्रूटची साधारण सहाशे हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. शेतकऱ्यांनी सुधारित जातीच्या फळबागांची लागवड करावी. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

Web Title: Solapur Dalimb : The number of orchards in Solapur district has reached one lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.