अरुण बारसकरसोलापूर : मिलेट कुठेही होऊ द्या, कितीही पीक पद्धती बदलली तरी ज्वारीचे कोठार सोलापूर जिल्हाच आहे, हे याही वर्षीच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रात ज्वारी पेरणीची नोंद झाल्याने ज्वारीचा सोलापुरी 'ब्रँड' कायम आहे.
केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत अनुदानासह राज्यातील सर्वच ३६ जिल्ह्यांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील पीक उत्पादनाला चालना देत ब्रेड बनविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी अनुदानही दिले जाते. अद्ययावत बियाणे, त्यासाठीची खते, शिवाय उत्पादीत धान्यापासून वेगवेगळी उत्पादने तयार करण्यासाठी अनुदानासह प्रोत्साहीत केले जाते.
सोलापूर जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे. तसे सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर फार वर्षांपासूनच घेतले जाते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी ज्वारी 'ब्रॅड'ची निवड करण्यात आली. त्यामुळेच मागील वर्षीच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात मिलेट (भरड धान्य) सेंटर सोलापूर येथे मंजूर केले होते.
अधिक वाचा: ज्वारी पिकातील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन
ज्वारी... साखर... अन् इथेनॉलज्वारी उत्पादनात सोलापूर जिल्हा राज्यात पहिला आहे. तसा साखर कारखानदारीतही सोलापूर जिल्हा राज्यात नंबर-१ आहे. इथेनॉल व वीज निर्मिती करण्यात सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने आघाडीवर आहेत. डाळिंब व केळी उत्पादनात सोलापूरचे नाव आघाडीवर आहेच.
कोकणातील ५ जिल्ह्यांसह भंडारा जिल्ह्यात ज्वारीची पेरणी शून्यावरपाच हजार हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले राज्यात ६ जिल्हे, एक हजाराच्या खाली सरासरी क्षेत्र असलेले ५ जिल्हे, तर २० हजार हेक्टरपेक्षा कमी ज्वारी क्षेत्र चार जिल्ह्यात आहे. इतर जिल्ह्यात ज्वारी पेरणी क्षेत्र यापेक्षा अधिक असले तरी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
जिल्हा सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र
जिल्हा | सरासरी | प्रत्यक्ष क्षेत्र |
सोलापूर | ३,१८,०५७ | २,३८,०३९ |
अहमदनगर | २,६७,८३४ | १,६७,८८९ |
धाराशिव | १,८१,४२८ | १,२७,२३१ |
बीड | १,६८,८२२ | १,३७,१९८ |
सातारा | १,३५,५३२ | ९७,०९३ |
पुणे | १,३४,३३६ | ७३,५२४ |
सांगली | १,२६,८६५ | १,०३,५१६ |
परभणी | १,१३,०९० | ८२,७५१ |
जालना | ८६,९३९ | ५७,०९६ |
छ. संभाजीनगर | ४६,३७७ | २४,०१० |
सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, बाजरीचे पीक चांगले येते. त्यामुळे प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यास वाव आहे. जिल्ह्यात 'हुरडा' व कृषी पर्यटन वाढतेयं, १० गुंठ्यात अगदी कमी कालावधीत ८० ते ९० हजार रुपयांपर्यंत उत्पादन शेतकरी घेत आहेत. जिल्ह्यात ज्वारीचे प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. बाजरीचेही सुरू होतील. - डॉ. लालासाहेब तांबडे, मुख्य शास्त्रज्ञ, सोलापूर विज्ञान केंद्र