कोल्हापूर व पुणे विभागातील गाळपाचा वेग दररोज वाढत असला तरी आज सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे. मात्र, काही दिवसांत कोल्हापूर व पुणे विभागातील साखर कारखाने ऊस गाळपात पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील १८ साखर कारखान्यांनी गाळपाचा पाच लाखांचा टप्पा पार केला आहे. सोलापूर विभागाचे गाळप ११३ लाख, तर कोल्हापूर व पुणे विभागाचे गाळप १११ लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक झाले आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्याचे गाळप ९० लाख मेट्रिक टन इतके झाले आहे.
राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळपाने आता वेग घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे गाळपाला व्यत्यय आला होता. मात्र, नंतर काही साखर कारखाने वगळता पुरेशा तोडणी यंत्रणेवर साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. यंत्रणेअभावी काही साखर कारखान्यांचे गाळप अतिशय मंद गतीने सुरू आहे. सध्या ऊस गाळपात सोलापर विभाग राज्यात आघाडीवर आहे. पुणे व कोल्हापूर विभागापेक्षा सोलापूर विभागाचे गाळप अवघ्या एक लाख मेट्रिक टनांनी अधिक आहे. मात्र, सध्या कोल्हापूर व पुणे विभागातील साखर कारखाने पर्ण क्षमतेने सरू आहेत, तर सोलापूर जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी पुरेशी यंत्रणा नाही. याचा फटका साखर कारखान्यांना बसत आहे. पुढील आठवड्यात कोल्हापूर व पुणे विभाग गाळपात राज्यात आघाडीवर राहतील.
पाच लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिकतात्यासाहेब कोरे वारणानगर, दत्त शेतकरी शिरोळ, सोनहीरा कडेगाव, क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड, भीमाशंकर आंबेगाव, दौंड शुगर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, विठ्ठल गुरसाळे, पांडुरंग श्रीपूर, ज्ञानेश्वर नेवासा व गंगाबाई शेवगाव या साखर कारखान्यांनी पाच लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप केले आहे.
६ लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिकगुरुकमॉडीटी जरांडेश्वरचे गाळप ७ लाख २१ हजार मेट्रिक टन इतके झाले आहे. सोमेश्वर बारामतीचे गाळप साडेसहा लाख, जवाहर शेतकरी साखर कारखाना हुपरीचे सव्वा सहा लाख, तर दि माळेगाव बारामतीचे गाळप ६ लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक झाले आहे.
बारामती अॅग्रो गाळपात प्रथम..राज्यात बारामती अॅग्रो, दौंड या साखर कारखान्याचे गाळप सर्वाधिक ११ लाख मेट्रिक टन इतके झाले आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने ९ लाख १० हजार, तर यशवंतराव मोहिते कृष्णा रेठरे बुद्दकचे गाळप ७ लाख ३१ हजार मेट्रिक टन इतके झाले आहे.