Lokmat Agro >शेतशिवार > सोलापूरच्या डाळिंब क्लस्टरला मंजूरी; जोडले जाणार जगाच्या बाजाराशी

सोलापूरच्या डाळिंब क्लस्टरला मंजूरी; जोडले जाणार जगाच्या बाजाराशी

Solapur pomegranates cluster approved by central government | सोलापूरच्या डाळिंब क्लस्टरला मंजूरी; जोडले जाणार जगाच्या बाजाराशी

सोलापूरच्या डाळिंब क्लस्टरला मंजूरी; जोडले जाणार जगाच्या बाजाराशी

केंद्रशासनाने देशातुन प्रायोगिक तत्वावर निवडलेल्या 12 समुह विकास कार्यक्रमापैकी द्राक्ष क्लस्टर नाशिक व डाळिंब क्लस्टर सोलापूर या दोन क्लस्टरची महाराष्ट्रातून निवड केलेली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान व पायाभुत सुविधा उपलब्ध होणार असून त्याद्वारे भविष्यात डाळिंब निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा वृध्दिंगत होण्यास मदत होईल.

केंद्रशासनाने देशातुन प्रायोगिक तत्वावर निवडलेल्या 12 समुह विकास कार्यक्रमापैकी द्राक्ष क्लस्टर नाशिक व डाळिंब क्लस्टर सोलापूर या दोन क्लस्टरची महाराष्ट्रातून निवड केलेली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान व पायाभुत सुविधा उपलब्ध होणार असून त्याद्वारे भविष्यात डाळिंब निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा वृध्दिंगत होण्यास मदत होईल.

शेअर :

Join us
Join usNext

भारत हा जागतिक स्तरावर फलोत्पादन पिकाचा सर्वात मोठा उत्पादक असून फळे आणि ‍भाजीपाला जागतिक उत्पादनात 10 टक्केपेक्षा जास्त वाटा आहे.सन 2019-20 या वर्षात देशाने 25.66 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर 320.77 दशलक्ष टन आतापर्यंतचे सर्वोच्च उत्पादन नोंदविले आहे, परंतु निर्यातीमध्ये 1.7 % भाजीपाला व 0.5 % फळपिके इतका वाटा आहे.जो इतर देशांपेक्षा अत्यंत कमी आहे.

भारतीय फलोत्पादन क्षेत्राची जागतीक, देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी, उत्पादनाच्या कापनीनंतर हाताळणी, मूल्यवर्धन आणि बाजार जोडणी या करिता पायाभूत सुविधांचा विकास करण्याकरीता, निवडलेल्या पिक समुहामध्ये स्पर्धा वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व पध्दतीचा वापर करण्याकरीता आणि जागतिक मुल्यसाखळीत भागधारकांना सामील करुन घेण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने फलोत्पादन क्लस्टर विकासाचा नविन कार्यक्रम जाहीर केला आहे.        

म्हणून सोलापूरची निवड     

 केंद्र शासनाच्या कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने देशातून 55 फलोत्पादन समुह निवडले असून त्यापैकी 12 समुह‍, फलोत्पादन समुह विकास योजनेंतर्गत प्रायोगिक तत्वावर निवडले आहेत. त्यापैकी  2 फलोत्पादन समुह महाराष्ट्रातुन निवडले असून त्यामध्ये द्राक्ष क्लस्टर - नाशिक व डाळिंब क्लस्टर - सोलापुर यांचा समावेश आहे.

सोलापूर –डाळिंब  क्लस्टरला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी पूर्व उत्पादन - उत्पादन, काढणीनंतरचे व्यवस्थापन व मुल्यवर्धन आणि लॉजिस्टिक्स, विपणन व ब्रँडिंग यासह संपुर्ण मुल्य शृंखलेच्या तीन्ही अनुलंब (Vertical) विकासाचा समावेश केलेला आहे.

 केंद्र शासन स्तरावरील प्रकल्प  मान्यता समितीने मान्यता दिली आहे.सोलापूर  - डाळिंब क्लस्टरसाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून  मे. बी.व्ही .जी.ग्लोबल फार्म वर्क्स  लि. सोलापूर  या संस्थेस मान्यता दिली.सदर प्रकल्पासाठीचे मे. बी.व्ही .जी.ग्लोबल फार्म वर्क्स  लि. सोलापूर  यांना अंमलबजावणी यंत्रणा म्हणून स्वीकृती पत्र दि 09/08/2023 रोजी प्राप्त झाले आणि राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते दि.28/08/2023 रोजी  प्रदान करण्यात आले त्याप्रसंगी डॉ.के.पी.मोते,संचालक फलोत्पादन,उदय देशमुख (प्रकल्प व्यवस्थापक), विजयकुमार चोले (मे.बी.व्ही .जी.ग्लोबल फार्म वर्क्स) हे उपस्थित होते.             

असे आहे स्वरूप    

सदर प्रकल्पामुळे २०हजार हेक्टर डाळिंब  क्षेत्र व  ३० हजार शेतक-यांना फायदा होईल. या प्रकल्पाची किंमत रक्कम रू. 247.67 कोटी असून त्यापैकी रक्कम रू. 98.92  कोटी केंद्रीय कृषि मंत्रालय अनुदान सहाय्य प्रदान करेल. अंमलबजावणी यंत्रणा स्वत:चे रू. 97.75 कोटी रूपये भांडवल व रू. 51 कोटी रूपयाचे मुदत कर्ज उभारणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रामुख्याने  प्रकल्पाअंतर्गत आधुनिक नर्सरी- 6, टिशू कल्चर प्रयोग शाळा- 2, 12 हजार 900 हे. क्षेत्रावरील जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, 20000 हे, क्षेत्रावर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन-20000 हे, क्षेत्रावर एकात्मिक किड व्यवस्थापन, 12900 हे. क्षेत्रावर प्लास्टिक अच्छादन, 20000 हे क्षेत्रावरील फळपिकाचे ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन,शीतगृह(5000  MT)-2,पूर्व शीतकरण गृह/फिरते पूर्व शीतकरण गृह-28,एकात्मिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केंद्र- 2,टर्मिनल मार्केट/ होलसेल मार्केट- 1 हे घटक राबणीण्यात येणार आहेत. हा प्रकल्प 4 वर्षात कार्यान्वित होणे अपेक्षित असून यामुळे सोलापूर डाळिंब क्लस्टर फलोत्पादन परिसंस्थेचा कायापालट होण्यास मदत होईल.

Web Title: Solapur pomegranates cluster approved by central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.