Solar Energy : कृत्रिम प्रकाशाद्वारे वीज निर्मितीची आशा पल्लवित झाली आहे. मेणबत्तीचा प्रकाश, आग किंवा विजेचा दिव्याच्या प्रकाशाद्वारे सोलार सेल चार्ज करण्याची शक्यता बळावली आहे. नव्या संशोधनानुसार ३७ टक्के चार्जिंग क्षमता नव्या सौर सेलमध्ये असल्याचा दावा केला जात आहे.
युरोपमधील लंडन येथील लिथुआनिया देशातील काउनास विद्यापीठातील संशोधकांनी कृत्रिम प्रकाशातून चार्ज होणारे सौर सेल विकसित केले आहेत. हे तंत्रज्ञान आणखी विकसित झाल्यास मोठ्या प्रमाणात घरगुती विजेची गरज भागविता येऊ शकते.
सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करता येते. घरातील दिवे, मेणबत्तीसारख्या कृत्रिम प्रकाशाद्वारे सौर सेल चार्ज करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे मोठे आव्हान होते. परंतू त्यासंदर्भातील संशोधन विकसित करण्यात आले आहे.
एलईडी दिव्याने केले सोलार सेल चार्ज
■ नव्या तंत्रज्ञानाद्वारे संशोधकांनी घरात वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या एलईडी दिव्याच्या प्रकाशाद्वारे सोलर सेल चार्ज केले.
■ घरात वापरले जाणारे सोलर सेल सूर्यप्रकाशाच्या तुलनेत कृत्रिम प्रकाशाद्वारे जास्त वीज निर्मिती करू शकतात, असा संशोधकांचा दावा आहे.
काय आहे तंत्रज्ञान?
■संशोधकांनी पेरावस्काईट सौर सेल विकसित केले आहे. ऑर्गेनिक सेमी कंडक्टरचा वापर करण्यात आला आहे.
■कृत्रिम प्रकाशाद्वारे ते चार्ज होऊ शकतात. मात्र, याचा व्यावसायिक वापर आणि उत्पादन कधी होऊ
शकेल, याबाबत संशोधक सध्या काही सांगू शकत नाहीत.
■ सौर ऊर्जा लोकांच्या गरजा किती पूर्ण करेल, हे स्पष्ट नसले, तरी त्यातून घरगुती वापराची गरज बऱ्यापैकी पूर्ण होऊ शकते. त्यामुळे नवे तंत्रज्ञान लवकरच व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध होईल, असा संशोधकांना विश्वास आहे.