शेती सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, याकरिता 'महावितरण'कडून पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३८ गावांत महावितरण उपकेंद्रांतर्गत वीजनिर्मितीसाठी विविध ठिकाणी ग्रामपंचायतीच्या जागेवर केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या गावातील ग्रा. पं. चे ठराव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यास लवकरच अंतिम मंजूरी देण्यात येणार असून नवीन वर्षात हे प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत.
ग्रामस्थांना अधिकाधिक वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत वीजनिर्मिती केंद्रे तयार केली जात आहेत. शेतीच्या कामांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढावा, जेणेकरून शेतकऱ्यांना विजेसाठी कुणावर अवलंबून राहावे लागणार नाही. त्याचबरोबर पर्यावरणाचेही संरक्षण होईल, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सौर प्रकल्प बसविले आहेत, त्यांना सामाजिक लाभ स्वरुपात ५ लाख रुपये प्रतिवर्ष इतके अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान प्रकल्प सुरू झाल्यापासून ३ वर्षासाठी आहे.
८३३ हेक्टर जमीन वाटप
• ग्रामपंचायत हद्दीतील एका प्रकल्पासाठी सरासरी द दहा ते पंधरा हेक्टर क्षेत्र यासाठी अपेक्षित असून जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रलंबित प्रस्तावांसाठी एकूण ८३३ हेक्टर जमिनीचे वाटप विविध गावांमध्ये केले आहे.
जि.प.च्या वतीने १८१ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयाला ५५ ग्रामपंचायतींपैकी ३८ ग्रामपंचायतींचे संमती ठराव प्राप्त झाल्याचे पत्र देण्यात आले आहे. सा. बां. विभाग, नगररचना विभाग, तहसीलचे ना हरकत • प्रमाणपत्र घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संबंधित ग्रामपंचायतींना सौर कृषी वाहिनी उभारण्यासाठी अंतिम मान्यता देण्यात येणार आहे, या कार्यक्रमांतर्गत ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सौर प्रकल्प बसविले आहेत. त्यांना सामाजिक लाभ स्वरुपात ५ लाख रुपये प्रतिवर्ष इतके अनुदान दिले जाईल. हे अनुदान प्रकल्प सुरू झाल्यापासून ३ वर्षासाठी दिले जाईल. प्रस्तावित ३८ गावांतून या योजनेंतर्गत १२० मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असल्याचे महावितरणचे उपकार्यकारी स्थापत्य अभियंता रवींद्र बाचकर यांनी सांगितले.
शेतकरी, जमीन मालक, सहकारी संस्था, ग्रा.पं. या सार्वजनिक उपक्रमाच्या सहभागासाठी पात्र असल्याने या योजनेचाशेतकरी, जमीन मालक, सहकारी संस्था, ग्रा.पं. या सार्वजनिक उपक्रमाच्या सहभागासाठी पात्र असल्याने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय ठराव प्राप्त गावांची नावे
• छत्रपती संभाजीनगर माळीवाडा, भांबर्डा, करोडी, कोलठाण, एकोड, जटवाडा
•खुलताबाद - सराई, भांडेगाव
• फुलंब्री - खामगाव, फुलंब्री, वडोद बाजार
• सिल्लोड - अंधारी, मोंढा, शिवना
• गंगापूर - कणकोरी, आपेगाव, हनुमंतगाव, डोणगाव
• कन्नड - वाकत, घुसरतांडा, नाचवेल, माळेगाव लोखंडी,अंधानेर, मोहर्डा, दभेगाव
• वैजापूर - लाख खंडाळा, बिलोनी, सवंदगाव, बाभूळतेल, भादली (प्रकल्प कार्यान्वित)
• पैठण- लोहगाव बु, लोहगाव, पांगरा, कडेठाण खु, गेवराई बु, ढोरकीन, कावसान, बालानगर
चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी
• विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प हे महावितरण कंपनीच्या ३३/११ केव्ही उपकेंद्रांशी थेट जोडले जाणार असल्यामुळे पारेषण प्रणालीची गरज भासणार नाही. आणि वितरण हानीमध्ये सुद्धा बचत होईल.
• उपकेंद्राजवळील सौर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नापीक जमिनी व ग्रामपंचायतींना त्यांच्या अतिरिक्त जमिनी या सौरऊर्जा प्रकल्पांसाठी भाडेतत्त्वावर देऊन चांगले उत्पन्न मिळवण्याची संधीसुद्धा मिळणार आहे.