Join us

Solar Krushi pumpa : आता शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य; कुसुम योजनेंतर्गत सौर कृषी पंप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 4:55 PM

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप संच उपलब्ध करून दिला जातो. (Solar Krushi pumpa)

Solar Krushi pumpa :

अमरावती : प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप संच उपलब्ध करून दिला जातो. ही योजना राज्य शासनाच्या महा ऊर्जा विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

यासाठी शासन ९० ते ९५ टक्के अनुदानाची सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के हिस्सा भरावा लागणार आहे.

योजनेसाठी १२ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करावा लागणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून पर्यावरणपुरक प्रमाणे या योजनेचे वैशिष्ट्य असून हरितक्रांतीची योजना आहे.  या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.

योजनेच्या लाभ मिळवण्यासाठी तसेच शेतकरी लाभार्थी निवडीचे निकषामध्ये विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी आदी तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी लाभासाठी पात्र असणार, पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी, अटल सौर कृषी पंप योजना टप्पा १ व २ किंवा मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अवजार शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत.

जिल्ह्याला २२८ एवढे सौर पंपाचे उद्दिष्ट आजघडीला शिल्लक असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रपर्यावरणवीजशेतकरीशेती