Lokmat Agro >शेतशिवार > Solar pump Yojana : नाशिक जिल्ह्यातील 22 हजार शेतकऱ्यांचे सौरपंप बसवले, वाचा सविस्तर 

Solar pump Yojana : नाशिक जिल्ह्यातील 22 हजार शेतकऱ्यांचे सौरपंप बसवले, वाचा सविस्तर 

Solar pumps installed for 22 thousand farmers in Nashik district, read in detail | Solar pump Yojana : नाशिक जिल्ह्यातील 22 हजार शेतकऱ्यांचे सौरपंप बसवले, वाचा सविस्तर 

Solar pump Yojana : नाशिक जिल्ह्यातील 22 हजार शेतकऱ्यांचे सौरपंप बसवले, वाचा सविस्तर 

Solar pump Yojana : 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेत राज्यात आतापर्यंत बसविलेल्या पंपांची (solar Pump) संख्या १ लाख ५० हजार ३०४ झाली आहे.

Solar pump Yojana : 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेत राज्यात आतापर्यंत बसविलेल्या पंपांची (solar Pump) संख्या १ लाख ५० हजार ३०४ झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : 'मागेल त्याला सौर कृषिपंप' (Magel Tyala Solar Pump) योजनेत राज्यात आतापर्यंत बसविलेल्या पंपांची संख्या १ लाख ५० हजार ३०४ झाली आहे. यामध्ये नाशिक परिमंडळात २२ हजार ५०९ सौरपंप (Solar Pump Yojana) बसविण्यात आले असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

सौर कृषिपंप बसविल्यावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध (Power Supply) होत असल्याने त्यांची अनेक दशकांची मागणी पूर्ण होते. हे पंप वीजजाळ्यावर अवलंबून नसल्याने शेतकरी दिवसा हव्या त्या वेळेला सिंचन करू शकतो. सौर ऊर्जानिर्मिती पॅनल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ कृषिपंपासाठी (Saur Krushi Pump) वीजबिलातून मुक्तता होते. सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते. सौर कृषिपंप बसविण्याच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत असल्याने सौरउर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे या योजनेसंदर्भात माहितीसाठी वीजग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भरावी लागते केवळ १० टक्के रक्कम
'मागेल त्याला सौर कृषिपंप' या राज्य सरकारच्या योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के आणि राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे सौर पॅनल्स, कृषिपंप असा संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के असून, त्यांना ९५ टक्के अनुदान मिळते.

Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सोलर पंप योजनेचा कोटा पूर्ण झाला का? इथं वाचा सविस्तर

Web Title: Solar pumps installed for 22 thousand farmers in Nashik district, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.