Lokmat Agro >शेतशिवार > Lactose Free Milk लॅक्टोज फ्री दुधाचे असे काही पर्याय जे शरीरसाठी आहेत वरदान

Lactose Free Milk लॅक्टोज फ्री दुधाचे असे काही पर्याय जे शरीरसाठी आहेत वरदान

Some of the lactose free milk substitutes are boon for the body | Lactose Free Milk लॅक्टोज फ्री दुधाचे असे काही पर्याय जे शरीरसाठी आहेत वरदान

Lactose Free Milk लॅक्टोज फ्री दुधाचे असे काही पर्याय जे शरीरसाठी आहेत वरदान

लॅक्टोज पचविणे अवघड जात असल्यास करा या दुधाचे सेवन ..

लॅक्टोज पचविणे अवघड जात असल्यास करा या दुधाचे सेवन ..

शेअर :

Join us
Join usNext

दूध हे पोषणमूल्यांनी समृद्ध असलेले पेय आहे. परंतु, काही लोकांना दुधात असलेले लॅक्टोज पचविणे अवघड जाते किंवा काहीजणांना दुग्धजन्य पदार्थांबद्दल एलर्जी असते. अशा परिस्थितीत, दुधाचे उपलब्ध असलेले इतर पर्याय वापरणे हा एक उत्तम उपाय ठरतो.

पुढे दिल्या प्रमाणे दुधाचे हे काही पर्याय पोषणमूल्यांनी परिपूर्ण आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चला, अशा काही प्रमुख पर्यायांबद्दल जाणून घेऊ या. Vegan Milk 
   
१. बदामाचे दूध

पोषणमूल्ये :-

  • प्रोटीन : १ ग्रॅम प्रति कप
  • कॅलरी : ३० - ५० कॅलरी प्रति कप
  • जीवनसत्त्वे : E, D आणि A
  • फॅट्स : साधारण २ - ३ ग्रॅम


फायदे :-

  • लो-कार्ब आणि लो-कॅलरी पर्याय
  • हार्ट-फ्रेंडली फॅट्स
  • लॅक्टोजमुक्त


कसे वापरावे :-
स्मूदीज, कॉफी, चहा, सूप्स, आणि बेकिंगमध्ये 

२. सोयाचे दूध

पोषणमूल्ये :-

  • प्रोटीन: 7 ग्रॅम प्रति कप
  • कॅलरी: 80-100 कॅलरी प्रति कप
  • जीवनसत्त्वे: B12, D आणि कॅल्शियम
  • फॅट्स: साधारण 4 ग्रॅम


फायदे :

  • प्रोटीनने समृद्ध
  • हृदयासाठी फायदेशीर
  • हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत


कसे वापरावे :-
चहा, कॉफी, स्मूदीज, आणि सूप्स

३. ओट्सचे दूध

पोषणमूल्ये :-

  • प्रोटीन : २-४ ग्रॅम प्रति कप
  • कॅलरी : १२०-१३० कॅलरी प्रति कप
  • फायबर : साधारण २ ग्रॅम
  • जीवनसत्त्वे : B१२, D आणि कॅल्शियम


फायदे :-

  • फायबर ने समृद्ध
  • हार्ट - हेल्थी
  • लॅक्टोजमुक्त


कसे वापरावे :-
स्मूदीज, सूप्स, कॅफे लाटे, आणि बेकिंग

४. नारळाचे दूध

पोषणमूल्ये :-

  • प्रोटीन: 0.5 ग्रॅम प्रति कप
  • कॅलरी: 45-60 कॅलरी प्रति कप
  • फॅट्स: साधारण 4-5 ग्रॅम
  • जीवनसत्त्वे: B12, D आणि कॅल्शियम


फायदे :-

  • लो-कार्ब
  • हार्ट-हेल्थी फॅट्स
  • लॅक्टोजमुक्त


कसे वापरावे :-
कढी, करी, मिठाई आणि बेकिंग

५. तांदुळाचे दूध

पोषणमूल्ये :-

  • प्रोटीन : ०.५-१  ग्रॅम प्रति कप
  • कॅलरी : १२०-१३० कॅलरी प्रति कप
  • कार्बोहायड्रेट्स : साधारण २२-२४ ग्रॅम
  • जीवनसत्त्वे : B12, D आणि कॅल्शियम


फायदे :-

  • लो-फॅट
  • डाइजेस्टिव्ह फ्रेंडली
  • लॅक्टोजमुक्त


कसे वापरावे :-
स्मूदीज, सिरीअल्स, आणि बेकिंग

६. काजूचे दूध

पोषणमूल्ये :-

  • प्रोटीन : १ ग्रॅम प्रति कप
  • कॅलरी : २५-५० कॅलरी प्रति कप
  • फॅट्स : साधारण २-३ ग्रॅम
  • जीवनसत्त्वे : B१२, D आणि कॅल्शियम


फायदे :-

  • लो-कार्ब
  • क्रिमी आणि स्वादिष्ट
  • लॅक्टोजमुक्त


कसे वापरावे :-
स्मूदीज, कॉफी, सूप्स, आणि डेसर्ट्स

दुधाचे हे पर्याय विविध पोषणमूल्यांनी भरलेले आहेत आणि त्यांचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात. आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार आपण या पर्यायांपैकी निवड करू शकतो. त्यामुळे आपल्या आहारात पौष्टिकता आणि विविधता वाढवण्यासाठी हे पर्याय उपयुक्त ठरतात.

लेखक 
डॉ. सोनल रा. झंवर 
सहाय्यक प्राध्यापक 
एम . जी . एम अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर

हेही वाचा - Aloeveras Health benefits & Products गुणकारी कोरफडीचे आरोग्यदायी फायदे व उत्पादने

Web Title: Some of the lactose free milk substitutes are boon for the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.