Lokmat Agro >शेतशिवार > ज्वारीला मिळतोय इतक्या हजारांचा भाव; मात्र उत्पादन खर्चही निघेना

ज्वारीला मिळतोय इतक्या हजारांचा भाव; मात्र उत्पादन खर्चही निघेना

Sorghum is getting the price of so many thousands; However, the production cost did not go away | ज्वारीला मिळतोय इतक्या हजारांचा भाव; मात्र उत्पादन खर्चही निघेना

ज्वारीला मिळतोय इतक्या हजारांचा भाव; मात्र उत्पादन खर्चही निघेना

शेतकऱ्यांना सध्या ज्वारीला दोन हजार पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. मात्र घटलेल्या उत्पादनामुळे यातून साधा उत्पादन खर्चही निघत नाही.

शेतकऱ्यांना सध्या ज्वारीला दोन हजार पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. मात्र घटलेल्या उत्पादनामुळे यातून साधा उत्पादन खर्चही निघत नाही.

शेअर :

Join us
Join usNext

संजय ठोंबरे
बाजार समितीत शेतकऱ्यांना सध्या ज्वारीला दोन हजार पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. मात्र घटलेल्या उत्पादनामुळे यातून साधा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरातील ज्वारी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी उत्पादनातही मोठी घट झाली. शेतकऱ्यांचे खर्च आणि उत्पादनाचे गणित बिघडले. एकरी जिरायतात दोन ते तीन क्विंटल व बागायतात पाच ते सहा क्विंटल ज्वारीचे उत्पादन मिळाले.

शेतकऱ्याची स्वतःची मेहनत वगळता एकरी सरासरी २१ हजार रुपये खर्च उत्पादनाचा विचार करतात ज्वारी, कडबा विक्रीतून सरासरी १८ हजार रुपये शेतकऱ्याला एकरी मिळाले. त्यामुळे यंदा तरी ज्वारीच्या पिकातून शेतकऱ्याच्या हाती काहीच पैसे मिळाले नाहीत.

उलट पैसे घालवावे लागल्याचे दिसते. यामध्ये काढणीच्या वेळी जाणवलेल्या मजूर टंचाईने खर्चात वाढ केली. सध्या ज्वारीला २ हजार ५०० ते ४ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे.

ज्वारीचा एकरी उत्पादन खर्च.. (रुपये)
नांगरट - २,०००
काकाऱ्या - १,००० 
पाळी - १,०००
पेरणी - १,५००
बियाणे - ५०० 
खत - १,५००
खुरपणी - २,५००
काढणी - ६,०००
कणसे मोडणी - १,५०० 
मळणी खर्च ३ क्विंटल - १,५००
एकूण खर्च - २१, ०००

एकरी उत्पादन घट (घरातील सदस्यांची मेहनत वेगळी) - २,५००
ज्वारी व कडबा विक्रीतून एकूण मिळालेली रक्कम - १८,८००

मिळणारे उत्पादन/उत्पन्न
• एकरी जिरायत ३, बागायत ६ क्विंटल
• ज्वारी भाव २,५०० ते ४,००० रुपये
• सरासरी - ३२००
• ज्वारी विक्रीतून मिळणारे पैसे - १२,८००
• कडबा ३००-४०० पेंढ्या
भाव शेकडा १००० ते १५०० यातून मिळतात ६०,०००

हेही संकट..
नैसर्गिक संकटातील अवेळी पाऊस, वादळ यामुळे ज्वारीचे नुकसान होत. याशिवाय सध्या शेतकऱ्यांना रानडुकरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पक्षीही दाणे टिपण्यासाठी कणसावर तुटून पडत असल्यानेही नुकसान होते.

माझी एक एकर ज्वारी आहे. ज्वारी उत्पादनातून मिळणाऱ्या पैशातून सेवा संस्थेचे कर्ज नवे-जुने करायचे ठरविले होते. माझे कर्ज तीस हजार रुपये होते. व्याज सहा टक्के असे मिळून ३१ हजार ५०० रुपये भरणा आहे. मात्र ज्वारीतून मिळाले अवघे १८ हजार रुपये. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत हातात काहीच उरले नाही. आता कर्ज कसे भरायचे हा प्रश्न आहे. - अनिल सुरवसे, ज्वारी उत्पादक शेतकरी, चिचोंडी पाटील

Web Title: Sorghum is getting the price of so many thousands; However, the production cost did not go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.