परभणी जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. यामुळे सोयाबीन पिकाचे उत्पादनही घटले आहे. वाढत्या महागाईत सोयाबीनला सध्या मिळणारा हा दर न परवडणारा आहे.त्यातच ५ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकणारे सोयाबीन आज ४४०० ते ४५०० प्रतिक्विंटल असे विकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन भाव वाढीसाठी किती दिवस घरातच ठेवावे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यंदा ३२ टक्के पावसाची तूट निर्माण झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात ५७ टक्के घट आली आहे.जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून याबाबत चक्कार शब्द नाही.
परभणी जिल्ह्यात सोयाबीन आणि 8 ही दोन नगदी पिके म्हणून शेतकऱ्यांकडून घेतली जातात. २१ हजार हेक्टर ४ लाख हेक्टर क्षेत्रावर या दोन पिकांची पेरणी आणि लागवड केली जाते. मात्र, सध्या या दोन्ही पिकांना भाव नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला असताना लोकप्रतिनिधीही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देत किमान १५ हजार रुपयांनी सोयाबीनची खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.शेतकऱ्यांनी पिकावर केलेला खर्चही उत्पन्नातून निघत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही दिवसांपासून दरातील चढ-उताराने शेतकऱ्यांनी बाजारपेठेत शेतमाल आणणे कमी केले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे. सध्याच्या दरात सुधारणा होण्याची आपेक्षा आहे. मात्र, दरवाढ सांगणे सध्या तरी अवघड दिसत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
- सध्या बाजारात ४४०० ते ४५०० रुपयांचा दर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळत आहे.
• सोयाबीन उत्पादक शेतकरी अधिकचा दर मिळेल, या अपेक्षेने घरातच सोयाबीन ठेवून भाव वाढीची वाट पाहत बसले आहेत.
• परंतु सध्यातरी भाव वाढ होताना दिसून येत नाही. त्यामुळे एकीकडे नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांना कोंडी सापडले आहे.
- तर दुसरीकडे बाजारपेठेत सोयाबीनला भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत.