Join us

Soybean Kapus Anudan : राज्यात ६५ लाख खातेदारांच्या खात्यावर सोयाबीन, कापूस पिकाचे अनुदान जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 10:04 AM

राज्यातील सुमारे ५० लाख शेतकऱ्यांना अर्थात ६५ लाख खातेदारांच्या खात्यावर अर्थसाह्य जमा झाल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली.

पुणे : सोयाबीनकापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे अर्थसाह्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

त्यानुसार राज्यातील सुमारे ५० लाख शेतकऱ्यांना अर्थात ६५ लाख खातेदारांच्या खात्यावर अर्थसाह्य जमा झाल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन वितरण झाले.

यंदा ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे २ हजार ३९८ कोटी ९३ लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले. गेल्यावर्षी ९६ लाख ७८७ खातेदार शेतकऱ्यांनी सोयाबीनकापूस उत्पादन घेतले होते.

त्यानुसार त्यांना अर्थसाह्यसाठी एकूण ४ हजार १९४ कोटी रुपये इतका निधी डीबीटीवर उपलब्ध आहे. त्यापैकी १ हजार ५४८ कोटी ३४ लाख रुपये कपाशी, तर सोयाबीनसाठी २ हजार ६४६ कोटी ३४ लाखांची तरतूद केली आहे.

४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना लाभअनुदान स्वतंत्ररीत्या वितरण करण्यासाठी महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. त्यावर शेतकऱ्यांची स्वतःचे संमतिपत्र व बँक खाते आधार आदी माहिती जमा करून ती माहिती जुळणे आवश्यक असल्याने यामध्ये काही कालावधी शेतकऱ्यांना याद्वारे लाभ दिला आहे. आधार होत राहील तसतशी उर्वरित शेतकऱ्यांना गेला. जवळपास ४९ लाख ५० हजार व अन्य माहितीची जसजशी जुळणी देखील या योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती आवटे यांनी दिली.

उर्वरित शेतकऱ्यांनाही रक्कम मिळणार आहे. त्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी, पुणे

टॅग्स :सोयाबीनकापूसपीकखरीपसरकारराज्य सरकारशेतकरीशेती