Pune : देशातील एकूण 26 राज्यात नोंदणी झालेल्या 7 लाख 64 हजार 731 शेतकऱ्यांपैकी 3 लाख 69 हजार 114 शेतकऱ्यांकडून 7 लाख 81 हजार 447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली असून ही खरेदी इतर राज्याच्या तुलनेने सर्वाधिक आहे. देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यांना मागे टाकत देशांमध्ये सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्राने केली आहे.
दरम्यान, अनेक जिल्ह्यांनी आपले खरेदी खरेदी उद्दिष्टे पूर्ण केलेली आहेत. तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला अडचण येऊ नये यासाठी, वेगाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया करा. दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पेमेंट पोहोचेल या संदर्भात वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्याच्या पणनमंत्र्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.
पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, राज्यात नाफेड व एनसीसीएफ अंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू आहे.सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची 1ऑक्टोबर 2024 पासून शेतकऱ्याची नोंदणी सुरू केली होती. त्यानुसार 15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील 562 खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सूरू करण्यात आली आहे.
"नोंदणी करता येणाऱ्या तांत्रिक अडचणी मुळे नोंदणीची मुदत एक वेळा वाढवली. त्यानंतर सुरुवातीला सोयाबीन खरेदीची मुदत 12 जानेवारी 2025 पर्यंत होती. मात्,र या मुदतीत अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी न झाल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांना विनंती करून खरेदीची मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. त्यानुसार राज्यात वेगाने खरेदी चालू आहे."
तसेच मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात खरेदीच्या तुलनेत महाराष्ट्राने सर्वाधिक खरेदी केली आहे. या पाचही राज्याची एकूण खरेदी 18 लाख 68 हजार 914 मॅट्रिक टन इतकी झाली असून त्यापैकी 7 लाख 81 हजार 447 मॅट्रिक टन खरेदी महाराष्ट्राने केली आहे.
राज्यात सर्वाधिक सोयाबीन खरेदी नांदेड जिल्ह्यातील झाली असून 57 हजार 528 शेतकऱ्यांकडून 1 लाख 290 मॅट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील 29 हजार 764 शेतकऱ्यांकडून 60 हजार 989 मॅट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. मध्यंतरीच्या काळात आलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून आजही वेगाने खरेदी प्रक्रिया सुरू आहे.
केंद्र सरकारने सन 2024-25 करीता सोयाबिनसाठी प्रति क्विंटल 4 चार 892 इतका हमीभाव घोषित केला असून त्यानुसार खरेदी सुरू आहे. हे दर हे मागील वर्षाच्या हमीभावापेक्षा 292 प्रति क्विंटल इतके जास्त आहे.सन 2024-25 मध्ये लागवडीखालील क्षेत्र 50.51 लाख हेक्टर व उत्पादन 73.27 लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे. पीएसएस खरेदीसाठी केंद्र सरकारने 14 लाख13 हजार 270 मे.टन (19.28%) मंजूरी दिली आहे.