Join us

Soybean Purchase Deadline: हजारो शेतकऱ्यांचे सोयाबीन घेणार का? आज आहे डेडलाईन वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:53 IST

Soybean Purchase Deadline : 'नाफेड'च्या (NAFED) दोन्ही यंत्रणांकडे नोंदणी केलेल्या सोयाबीन खरेदीसाठी (Soybean Purchase) शासनाने ६ फेब्रुवारी ही मुदत दिली. ती मुदत आज संध्याकाळपर्यंत संपते आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी कसे होणार याकडे लक्ष लागले आहे.

अमरावती : 'नाफेड'च्या (NAFED) दोन्ही यंत्रणांकडे नोंदणी केलेल्या सोयाबीन खरेदीसाठी (Soybean Purchase) शासनाने ६ फेब्रुवारी ही मुदत दिली. या मुदतीत व्हीसीएमएफची खरेदी होईल, पण नोंदविलेल्या दीड हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीचे आव्हान 'डीएमओ'समोर आहे. पुन्हा मुदतवाढ मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले.

जिल्ह्यात 'व्हीसीएमएफ'च्या (VCMF) ११ व 'डीएमओ'च्या (DMO) नऊ केंद्रांवर शासन दराने सोयाबीनची खरेदी होत आहे. यामध्ये काही केंद्रांवर दोन महिन्यांपासून, तर काही केंद्रांवर अडीच महिन्यांपासून सोयाबीन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.

यामध्ये आतापर्यंत १७ हजार ८६५ शेतकऱ्यांचे ३.६२ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. नाफेडला हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यात १९ हजार ६०१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन (Online) नोंदणी केली होती.

'डीएमओ'कडे नोंदणीतले शेतकरी बाकी

डीएमओच्या केंद्रांवर सोमवारी १२ व व्हीसीएमएफच्या केंद्रांवर मंगळवारी २७६ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.

बारदाना मुबलक, गोदामाची चिंता

* सोयाबीन खरेदीसाठी दोन्ही यंत्रणांकडे बारदाना मुबलक आहे. परंतु, गोदामामुळे चिंता वाढली आहे. सध्या वखार महामंडळाची गोदाम फुल्ल झालेली आहेत.

* १५१० शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी ६ फेब्रुवारीलाच करण्याचे आव्हान आता खरेदी यंत्रणांसमोर आहे. अशा परिस्थितीत यंत्रणांना खरेदीची गती वाढवावी लागेल.

'व्हीसीएमएफ'च्या तुलनेत डीएमओ माघारले

'व्हीसीएमएफ'च्या ११ केंद्रांवर मंगळवारपर्यंत ११ हजार ४६५ शेतकऱ्यांची खरेदी आटोपली आहे, तर डीएमओच्या ९ केंद्रांवर ८ हजार ३३९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली. त्यातील ६४१३ शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी आटोपली आहे. त्यामुळे पोर्टल बंद झाल्यास शेतकऱ्यांची चिंता वाढली. 'डीएमओ'चे टार्गेट पूर्ण झाल्याने खरेदीची गती मंदावल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

मुदतवाढीसंदर्भात पत्र प्राप्त नाही. त्यामुळे अखेरच्या दिवशी अधिकतम शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीचा प्रयत्न आहे. - अजय बिसणे, जिल्हा विपणन अधिकारी

'नाफेड'ची खरेदी स्थिती

नोंदणी केलेले शेतकरी१९,६०१
खरेदी केलेले शेतकरी१७,८६५
खरेदी बाकी शेतकरी१,५१०
खरेदी सोयाबीन (क्विं.)३.६२ लाख

हे ही वाचा सविस्तर : Famers Success Story: दुष्काळी पट्ट्यातील 'हे' गाव 'मिरची हब' म्हणून येतंय नावारुपाला वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड