Lokmat Agro >शेतशिवार > परळी वैजनाथला होणार सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र

परळी वैजनाथला होणार सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र

Soybean research training and processing sub-centre to be set up at Parli Vaijnath | परळी वैजनाथला होणार सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र

परळी वैजनाथला होणार सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र

मौजे जिरेवाडी येथील शासकीय जमिनीवर हे प्रशिक्षण व प्रक्रीया उपकेंद्र सुरु करण्यात येईल.

मौजे जिरेवाडी येथील शासकीय जमिनीवर हे प्रशिक्षण व प्रक्रीया उपकेंद्र सुरु करण्यात येईल.

शेअर :

Join us
Join usNext

परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे होते. यामुळे सोयाबीन उत्पादनास गती येईल.

मौजे जिरेवाडी येथील शासकीय जमिनीवर हे प्रशिक्षण व प्रक्रीया उपकेंद्र सुरु करण्यात येईल. या उपकेंद्रामध्ये एकूण १५ पदे निर्माण करण्यात येतील. यासाठी २४ कोटी ५ लाख रुपये निधीस मान्यता देण्यात आली. सोयाबीन हे मराठवाड्यातील महत्त्वाचे पीक असून देशात १२०.९० लाख हेक्टर क्षेत्रावर तर महाराष्ट्रात ४९.०९  लाख हेक्टर आणि मराठवाड्यात २४.८७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची लागवड होते. बीड जिल्ह्यात सोयाबीनखाली ३ लाख हेक्टर जमीन आहे. या उपकेंद्राच्याद्धारे सोयाबीनच्या विविध वाणांची निर्मिती करण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके घेण्यात येतील.

Web Title: Soybean research training and processing sub-centre to be set up at Parli Vaijnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.