विनोद पाटीलशिगाव : वाळवा तालुक्याच्या ऊसपट्टयात शिगाव येथे शेतकऱ्यांचा शेती गट कार्यरत आहे. मूल्य साखळीअंतर्गत एक हजारांहून अधिक संख्येने असलेले शेतकरीसोयाबीन, भुईमूग व हरभरा आदींचे बीजोत्पादन करीत आहेत. सोयाबीन बियाण्यात प्रचंड खूप असणारे ब्रँड तयार करून बियाण्याने ओळख केली आहे.
शिगाव हे सुमारे सात हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील कौस्तुभ बारवडे हे उच्च शिक्षित व प्रयोगशील युवा शेतकरी आहेत. २०१४ ते २०१८ पर्यंत त्यांनी झुकेनी, चेरी टोमॅटो बेसिल, रेड कॅबेज आदी परदेशी भाज्यांची शेती केली. त्यात ओळखही तयार केली.
पुढे त्यांनी २०१९ मध्ये शेतकऱ्यांना एकत्रित करून शेती गटाची स्थापना केली. आज सुमारे एक हजार ११० पर्यंत सभासद शेतकरी तसेच परिसरातील एकूण २० शेतकरी गट एकत्र आहेत.
जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र कार्यरत आहे. येथील सोयाबीन बियाणे पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाकडील सोयाबीनच्या फुले संगम, फुले किमया या पैदासकार वाणांपासून बीजोत्पादनास सुरुवात केली.
लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकरी त्यात कुशल होऊ लागले. केवळ सोयाबीनपुरते मर्यादित राहून चालणार नव्हते. मग खरीप हंगामात इंद्रायणी भात, भुईमूग, त्यात फुले वारणा, फुले मोरणा, तर हरभरा पिकात फुले विक्रम वाणाचे बीजोत्पादन सुरू केले.
शेतकऱ्यांना मूल्य साखळी अंतर्गत होणारा फायदा• माती परीक्षण व बीजप्रक्रिया मोफत.• बाजार भावापेक्षा अल्प दरात बियाण्यांची विक्री.• खते, औषधे माफक दरात.• सोयाबीन पिकाच्या वाढीच्या पाच टप्प्यात कृषी विद्यापीठाचे संशोधक, कृषी विभागातील अधिकारी, शेतकरी यांचे मोफत मार्गदर्शन शिबिर.• पिकांची तीन टप्प्यांत पाहणी.• शेतकऱ्यांच्या गुणवत्ताधारक सोयाबीनला बाजारभावापेक्षा दहा टक्के वाढीव दराने खरेदी.
शेतकऱ्यांचा नवीन शिकण्याचा ध्याससोयाबीन क्षेत्रात नवीन क्रांती घडवण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने नवनवीन बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा ध्यास. त्याचबरोबर सोयाबीनवर प्रक्रिया करून त्यापासून तयार होणारे मूल्यवर्धीत उपद्रव्यांची निर्मिती करणे.