Lokmat Agro >शेतशिवार > सोयाबीन अनुदान केवायसीमुळे अडकलंय? आता घरच्याघरी तुमच्या मोबाईलवर कशी कराल ई-केवायसी

सोयाबीन अनुदान केवायसीमुळे अडकलंय? आता घरच्याघरी तुमच्या मोबाईलवर कशी कराल ई-केवायसी

Soybean subsidy stuck due to KYC? Now how to do e-KYC on your mobile at home | सोयाबीन अनुदान केवायसीमुळे अडकलंय? आता घरच्याघरी तुमच्या मोबाईलवर कशी कराल ई-केवायसी

सोयाबीन अनुदान केवायसीमुळे अडकलंय? आता घरच्याघरी तुमच्या मोबाईलवर कशी कराल ई-केवायसी

Soybean Anudan e Kyc कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये पोहोचावा, याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.

Soybean Anudan e Kyc कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये पोहोचावा, याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये पोहोचावा, याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.

आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच शेतकरी एकवेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. पहिल्या वेळी लॉगिन करतानाच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे टप्पे
१) https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.
२) 'Disbursement Status' (वितरण स्थिती) या टॅबवर क्लिक करा.
३) Enter Aadhaar Number' या रकान्यात आपल्या आधार क्रमांकाची नोंद करा.
४) captcha रकान्यात दिलेल्या सांकेतिक अंक-अक्षरांची नोंद करा.
वापरकर्त्याला पुढील पृष्ठ दिसू लागेल. त्या पृष्ठावर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन पर्याय दिसतील.

ओटीपी आधारित ई-केवायसी
१) 'OTP' या बटणावर क्लिक करा.
२) तुमच्या आधार-संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.
३) ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ओटीपीची नोंद करा.
४) 'Get Data' या बटणावर क्लिक करा.
५) तुम्ही नोंद केलेला ओटीपी, मोबाईलवर प्राप्त ओटीपीसोबत जुळल्यास ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.

बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी
१) 'Biometric' या बटणावर क्लिक करा.
२) वापरकर्त्याने यंत्रणेमध्ये स्थापित केलेल्या उपलब्ध उपकरणांमधून योग्य पर्यायाची निवड करावी.
३) योग्य उपकरणाची निवड केल्यास ड्रायव्हर काम करू लागेल.
४) Biometric उपकरणाचा दिवा प्रकाशित होईल.
५) वापरकर्त्याने या प्रकाशित भागावर आपले बोट ठेवून दाबावे.
६) बायोमेट्रिकची नोंद घेतली जाईल आणि ती यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा मेसेज पटलावर दिसू लागेल.
७) Validate UID वर क्लिक करा.
८) ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल.

Web Title: Soybean subsidy stuck due to KYC? Now how to do e-KYC on your mobile at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.