Join us

Soybean Theft : देऊळगाव राजा येथून चक्क २२ क्विंटल सोयाबीनची झाली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 10:23 AM

शेतकऱ्याने (Farmer) सोयाबीन पिकाची (Soybean Crop) काढणी करून शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेले २२ क्विंटल सोयाबीनची चोरीस (Soybean Theft) गेले आहे.

देऊळगाव राजा : शेतकऱ्याने सोयाबीन पिकाची काढणी करून शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेले २२ क्विंटल सोयाबीनचीचोरीस गेले आहे.

चोरीस गेलेल्या २२ क्विंटल सोयाबीनची किंमत जवळपास एक लाख पाच हजार सहाशे रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी शनिवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जालना रोडवरील हॉटेल चैत्रबनच्या बाजूला रामविजय भालचंद्र नरोडे यांचे शेत आहे. सोयाबीन पिकाची मळणी केल्यानंतर त्यांनी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवले होते.

शुक्रवारी रोजी अज्ञात चोरट्याने मध्यरात्री सदर पत्र्याचे शेड तोडून ४१ पोते सोयाबीन म्हणजेच २२ क्विंटल चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी रामविजय भालचंद्र नरोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद गवई तपास करीत आहेत.

हेही वाचा : Rabbi Maize Crop Management : अधिक उत्पादनाची हवी असेल हमी; तर 'अशी' करा रब्बीत मका पिकाची पेरणी

टॅग्स :सोयाबीनशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजारजालनामराठवाडाचोरीपोलिस