Join us

सोयाबीन आले कापणीला; पण शेतकऱ्यांना मजूर काही मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 1:00 PM

औंढा तालुक्यातील जवळाबाजारसह परिसरातील दहा ते बारा गावांमध्ये सोयाबीन कापणीला प्रारंभ झाला आहे. परंतु मजूर वर्गाची मनधरणी करुन ही ...

औंढा तालुक्यातील जवळाबाजारसह परिसरातील दहा ते बारा गावांमध्ये सोयाबीन कापणीला प्रारंभ झाला आहे. परंतु मजूर वर्गाची मनधरणी करुन ही ते येईना झाले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग घरातील सदस्यांनाच कापणीला घेऊन जाऊ लागले आहेत.

यावर्षी जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाला. या पावसावरच शेतकऱ्यांनी नगदी पीक सोयाबीनचा पेरा घेतला. सर्व संकटांवर मात करत सद्यस्थितीत शेतकरी सोयाबीन कापणीची तयारी करीत आहे. परंतु मजूर मिळत नाही. त्यामुळे हे तिसरे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. सोयाबीनची पेरणी केली. तेव्हा काही दिवसानंतर पावसाची कमी जाणवत होती. त्यानंतर पाऊस पडला. परंतु यंदा दीड महिन्यांपासून येलो मोझॅकने शेतकऱ्यांना त्रस्त करुन सोडले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाची फवारणी करुन ही काही उपयोग होत नाही. त्यामुळे किती सोयाबीन पदरात पडते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

शासनाने सोयाबीनला योग्य भाव द्यावा.....

  •  गतवर्षी सोयाबीनला ५ हजार ५०० रुपये क्विंटल एवढा भाव होता. यावर्षी अधिकचा भाव मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटले होते. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा अधिक केला आहे. शासनाने ६ ते ७ हजार रुपये भाव देणे गरजेचे आहे. - रामप्रसाद चव्हाण, आडगाव रंजे, शेतकरी 
  • शेतकरीवर्ग दरवर्षी अनेक संकटांचा सामना करतो. पिकांच्या यावर्षी सोयाबीन उताराच्यावर रब्बी कापणीची मजुरीही हंगामाचे गणित वाढली आहे. त्यामुळे ठरविले जाते. सोयाबीन पुढच्या वर्षी यावर्षी सोयाबीन घ्यावे की नाही? असा प्रश्न पडला आहे. -गणेश गाढवे 
  • खरीप हंगामातील किती पदरात पडते, हे पाहणे गरजेचे आहे. -अशोक चव्हाण, जवळाबाजार, शेतकरी जवळाबाजार, शेतकरी 

गतवर्षी सोयाबीन एका एकराला ३५०० रुपये मजुरी घेतली जात होती. कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे परंतु यावर्षी मजुरांच्या हाताला कुठे काम मिळत नाही. अशावेळी सोयाबीन कापणीला बोलाविले तर ३ हजार ५०० जावे लागत आहे. यावर्षी दोन्ही ते ३ हजार ६०० रुपये एकरी मजुरी संकटांचा सामना करत शेतकरी मागत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग घरातील सदस्यांनाच शेती कामासाठी घेऊन जात आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी दोन्ही संकटांचा सामना करत शेतकरी सोयाबीन कापणी करू लागला आहे.

टॅग्स :शेतकरीपीकपीक व्यवस्थापन