Join us

जिल्ह्यात शेती अन् शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी २०० कोटींवर खर्च !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 4:40 PM

पारंपरिक शेतीवर अवलंंबून न राहता आता नवीन पिकांची लागवड करण्यासाठी शासन प्रोत्सहन देत आहे. काय आहे हे नवीन पिक जाणून घेऊया.

वाशिम जिल्ह्यात शेतीवर अवलंबून ९० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक आहेत. त्यामुळे याच घटकावर शासनाने लक्ष केंद्रित करून गेल्या काही महिन्यांत शेती अन् शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी २०० कोटींपेक्षा अधिक निधी जिल्ह्याला मंजूर केला. 

ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरली आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी या दोन हंगामातील पिकांच्या उत्पादनावरच अधिकांश शेतकऱ्यांची भिस्त असते; मात्र नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडून २०२३-२४ मध्ये दोन्ही हंगामात शेतीपिकांचे अतोनात नुकसान होते. त्याची भरपाई म्हणून चालूवर्षी १७९ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळती करण्यात आली आहे. यासह गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत आतापर्यंत अपघातग्रस्त कुटुंबातील ६१ वारसांना १ कोटी १० लक्ष रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली.कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत चालू वर्षात जिल्ह्यातील २११ शेतकरी लाभार्थीना १ कोटी ७३ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे अनुदान देण्यात आले. एकूणच या सर्व योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याने संकटात सापडलेला शेती उद्योग तग धरू शकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

नाविन्यपूर्ण 'चिया'ने दिला शेतकऱ्यांना आधार• कृषी विभागाचा सततचा पाठपुरावा आणि युद्धस्तरावर झालेल्या जनजागृतीमुळे जिल्ह्यात सेंद्रीय पध्दतीने ८९८ हेक्टरवर चिया या नाविण्यपूर्ण पिकाची रबी हंगामात प्रथमच लागवड करण्यात आली. • चिया'ला पारंपरिक पिकांच्या तुलनेत प्रतिक्विंटल ४ ते ५ हजार रुपये अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला.

'रोहयो'तून १७० हेक्टरवर फळपिकांची लागवडहंगामनिहाय घेतल्या जाणाऱ्या पारंपरिक पिकांना अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, किडरोग आदी स्वरूपातील नैसर्गिक आपत्तीचा धोका लागून असतो. त्यामुळे जिल्ह्यात पर्यायी व्यवस्था म्हणून फळबागांचे क्षेत्र वाढणे अत्यावश्यक झाले आहे. ही बाब लक्षात घेवून चालूवर्षी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून १७० हेक्टर क्षेत्रावर फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. आकडेवारी

१.७३ कोटी कृषी यांत्रिकीकरणावरील खर्च 

१.१० कोटी अपघात विम्याची रक्कम

१७९ कोटी पीकविम्याची प्राप्त रक्कम

लागवड क्षेत्र 

१७० हेक्टर रोहयोतून झालेली फळपीक लागवड

८९८ हेक्टर रब्बीत 'चिया'चे लागवड क्षेत्र

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती