Join us

Spice Crops : मसाला पिकांबाबत शेतकरी उदासीन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 4:47 PM

Spice Crops : पारंपरिक पिकांबरोबरच नवीन पिकांचा विचार केल्यास शेतकरी नफा मिळवू शकतो. कसा ते वाचा

Spice Crops :

सुधीर चेके पाटील : 

पारंपरिक शेतीत आधुनिक प्रयोगातून पिकांच्या नवीन सुधारित जाती, आंतरपीक आणि सहपीक घेऊन शेतकरी अधिक उत्पादन मिळवत असले, तरी त्यास बाजारात योग्य मोबदला मिळत नसल्याने शेती तोट्याची ठरतेय.

बाजारात दहा रुपयांना दोन जुड्या इतका कमी दर कोथिंबिरीला मिळतो. कधी-कधी तर बाजारात विक्रीस आणलेला माल तसाच सोडून द्यावा लागतो. याऐवजी जर धन्याचे उत्पादन घेतले, तर त्यातून भरघोस नफा मिळत असल्याचे चित्र असतानाही एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ अर्धा टक्का क्षेत्रावरच मसाला व फूलशेती होते.मसाल्यांना जगभरात मागणी असल्याने त्याचे भावही वर्षागणिक हमखास वाढतात. त्यामुळे मसाला पिकांतून तोटा सोसावा लागण्याची शक्यता फारच कमी आहे; मात्र या पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता आहे.वातावरण पोषक असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील एकूण वहिती क्षेत्रापैकी केवळ ०.४६ टक्के क्षेत्रावर मसाला व फूलशेती होते. धने, ओवा, बडीसोप, काळेजिरे ही पिके कमी पाण्यात आणि कमी कालावधीत अधिक नफा देणारी असतानाही शेतकरी 'मोनोक्रॉपिंग'मध्ये अडकलेले आहेत. मसाला पिकांबाबत बियाण्यांची निवड, लागवड पद्धत, व्यवस्थापन याबाबतही शेतकऱ्यांमध्ये फारशी माहिती नसल्याने त्याचा बाऊ केला जातो. त्या अनुषंगाने जनजागृती करण्याची गरज आहे.

उत्पादन व उत्पन्नाचे गणितएका हेक्टरावरील मिरची लागवडीतून २ लाख २ हजार किलो उत्पादन मिळते. त्यास २० रुपये किलोचा दर गृहित धरल्यास ४ लाख ४० हजारांचे उत्पन्न हाती येते. यातून उत्पादन खर्च १ लाख ६ हजार वजा केल्यानंतर एका हेक्टरातून तब्बल ३ लाख ३४ हजारांचा निव्वळ नफा हाती येतो. . याचप्रमाणे हळदीतून ४ लाख २० हजार, अद्रक ३ लाख ५२ हजार, पानपिंप्री अडीच लाख, सफेद मुसळी ७ लाख ४० हजार, नागवेली १ लाख १० हजार, अॅस्टर ३ लाख ७० हजार, गुलाब ३ लाख ६० हजार, शेवंती २ लाख ३२ हजार, मोगरा १ लाख ५ हजार तर झेंडूद्वारे १ लाख १५ हजारांचा निव्वळ नफा हाती येतो.

वहितीखालील क्षेत्र७ लाख ५६ हजार ९६२ हेक्टर, मसाला व फूल पिकाचे क्षेत्र, ३ हजार ५१५ हेक्टर, टक्केवारी ०.४६शेतीची स्थितीजिल्ह्यात मिरची, हळद, अद्रक, पानपिंप्री, सफेद मुसळी,  नागवेल, ॲस्टर, गुलाब, शेवंती, मोगरा आणि झेंडू हीच मसालावर्गीय पिके व फूल शेती केली जाते.

३५१५.७ एकूण क्षेत्र तालुकानिहाय स्थिती पिके                  एकूण क्षेत्रमिरची                 १४२२,०हळद                   ६०५.९अद्रक                  २७६.५पानपिप्री               ४८.०सफेद मुसळी       १४१.०नागवेली                १७.२ॲस्टर                  ५.१गुलाब                  १८.२शेवंती                  १२.२मोगरा                  ७.४

पारंपारिक पिकांबरोबरच नवीन पिकांकडे वळावे

पारंपारिक पिकांतून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी मसाला पीके, फुलशेती, बिजोत्पादन यासारख्या अधिक नफा मिळवून देणाऱ्या पिकांकडे वळणे काळाची गरजआहे. इतर बाबीसाठी कृषी विभाग यासाठी कायमच तत्पर आहे.- ज्ञानेश्वर सवडतकर,  तालुका कृषी अधिकारी, चिखली

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक