Lokmat Agro >शेतशिवार > Spray Pump : किती शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप? उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार पंप?

Spray Pump : किती शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप? उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार पंप?

Spray Pump: How many farmers are allocated spray pumps? When will the remaining farmers get pumps? | Spray Pump : किती शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप? उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार पंप?

Spray Pump : किती शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप? उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार पंप?

Spray Pump Scheme Laatest Updates : शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जातून लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली असून राज्यभरातील २ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना फवारणी पंप वाटपाचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे.

Spray Pump Scheme Laatest Updates : शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जातून लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली असून राज्यभरातील २ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना फवारणी पंप वाटपाचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Spray Pump Scheme Laatest Updates :  राज्य सरकारने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखी विकासासाठी विशेष कृती योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर फवारणी पंपाचे वाटप करण्यात येत आहे. तर अनेक शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेंतर्गत राज्यातील २ लाख ३६ हजार ४२७ शेतकऱ्यांना फवारणी पंप वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तर यासाठी ८१ कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.  आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांपैकी ८६ हजार ८०७ शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले आहे. 

कापूस मूल्यसाखळीतून फवारणी पंपाचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील २० जिल्ह्यातून २ लाख ९५ हजार८१२ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. तर त्यातील २ लाख ९३ हजार ९२५ अर्ज हे लॉटरीसाठी पात्र ठरले होते. तर सोयाबीन मुल्यसाखळीतून फवारणी पंपाचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील २६ जिल्ह्यातील १ लाख ८९  हजार ७०३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १ लाख ८८ हजार ३८७ शेतकऱ्यांचे अर्ज पात्र झाले असून ९६ हजार ७६५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्ह्यासाठी लक्षांक ठरवून देण्यात आले होते. त्यामध्ये लातूर जिल्ह्यासाठी सर्वांत जास्त म्हणजे १३ हजार ४०० शेतकऱ्यांना फवारणी पंपाच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाकडून फवारणी पंपाचा पुरवठा करण्यात येत आहे. लक्षांकानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये फवारणी पंपाचे वाटप सुरू असून आत्तापर्यंत निवड झालेल्या ८६ हजार शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटर करण्यात आले आहे. 

Web Title: Spray Pump: How many farmers are allocated spray pumps? When will the remaining farmers get pumps?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.