Lokmat Agro >शेतशिवार > Spray Pump Scheme : तुमच्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना मिळणार फवारणी पंप? किती शेतकऱ्यांची निवड?

Spray Pump Scheme : तुमच्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना मिळणार फवारणी पंप? किती शेतकऱ्यांची निवड?

Spray Pump Scheme: How many farmers will get spray pump in your district? How many farmers choose? | Spray Pump Scheme : तुमच्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना मिळणार फवारणी पंप? किती शेतकऱ्यांची निवड?

Spray Pump Scheme : तुमच्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना मिळणार फवारणी पंप? किती शेतकऱ्यांची निवड?

फवारणी पंप योजनेसाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी लक्षांक ठरवून दिला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना फवारणी पंप १०० टक्के अनुदानावरून मिळणार आहे.

फवारणी पंप योजनेसाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी लक्षांक ठरवून दिला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना फवारणी पंप १०० टक्के अनुदानावरून मिळणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्य सरकारने कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेची घोषणा केली असून या अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपावर शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे. ही योजनेत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांनी निवड करण्यात आली आहे. पण अंतिम यादीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचो नाव नसल्याचा आरोप काही शेतकऱ्यांकडून करण्यात आला होता. 

दरम्यान, कापूस उत्पादन मूल्य साखळी अंतर्गत १ लाख ६ हजार तर सोयाबीन मूल्य साखळी अंतर्गत १ लाख ३० हजार शेतकऱ्यांच्या लक्षांक ठेवण्यात आला होता. या योजनेसाठी राज्यभरातील ४ लाख ९४ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. तर त्यातील  १ लाख ९१ हजार शेतकऱ्यांची अंतिम यादीमध्ये लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे. 

कोणत्या जिल्ह्यासाठी किती लक्षांक?
जिल्हा - सोयाबीन मुल्यसाखळीसाठी लक्षांक 

  • नाशिक - २३९०
  • धुळे - ५२०
  • नंदुरबार - ८१०
  • जळगाव - ९३०
  • अहिल्यानगर - २७४०
  • पुणे -६६०
  • सोलापूर - १४८०
  • सातारा - २३५०
  • सांगली - १३१०
  • कोल्हापूर - १३३०
  • छ.संभाजीनगर - ४५०
  • जालना - ४३४०
  • बीड - ७१००
  • लातूर - १३४००
  • धाराशिव - ८९००
  • नांदेड - ११०७८
  • परभणी - ७८३०
  • हिंगोली - ८०४०
  • बुलढाणा - १२३६०
  • अकोला - ६२७०
  • वाशिम - ९३४०
  • अमरावती - ८७५०
  • यवतमाळ - ८३५०
  • वर्धा - ३७१०
  • नागपूर - ३०००
  • चंद्रपूर - २६००

 

या योजनेसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी 

कापूस मूल्यसाखळीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज आणि लॉटरीमध्ये निवड झालेल्या अर्जाची संख्या

सोयाबीन मूल्यसाखळीमध्ये शेतकऱ्यांचे अर्ज आणि पात्र शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी

Web Title: Spray Pump Scheme: How many farmers will get spray pump in your district? How many farmers choose?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.