Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Sowing लागली चाहूल रोहिणीची.. शेतशिवारात धांदल पेरणीची

Kharif Sowing लागली चाहूल रोहिणीची.. शेतशिवारात धांदल पेरणीची

started rohini nakshatra starting crop sowing | Kharif Sowing लागली चाहूल रोहिणीची.. शेतशिवारात धांदल पेरणीची

Kharif Sowing लागली चाहूल रोहिणीची.. शेतशिवारात धांदल पेरणीची

शिराळा तालुक्यातील शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर भात पेरणीस सुरुवात करतो. सागाव परिसरात मात्र रोहिणी नक्षत्राच्या अगोदर धूळवाफेवरील पेरणी करून शेतकरी आगाप पीक साधण्याचा प्रयत्न करत असतात.

शिराळा तालुक्यातील शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर भात पेरणीस सुरुवात करतो. सागाव परिसरात मात्र रोहिणी नक्षत्राच्या अगोदर धूळवाफेवरील पेरणी करून शेतकरी आगाप पीक साधण्याचा प्रयत्न करत असतात.

शेअर :

Join us
Join usNext

सहदेव खोत
पुनवत : शिराळा तालुक्यातील शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर भातपेरणीस सुरुवात करतो. सागाव परिसरात मात्र रोहिणी नक्षत्राच्या अगोदर धूळवाफेवरील पेरणी करून शेतकरी आगाप पीक साधण्याचा प्रयत्न करत असतात. सागाव येथे रविवारी अनेक शेतकऱ्यांनी पेरणीचा प्रारंभ केला.

शिराळा तालुक्याला जिल्ह्यात भाताचे आगार म्हणून संबोधले जाते. खरीप हंगामात शिराळा तालुक्यात प्रामुख्याने हे पीक घेतले जाते. यासाठी संकरित व गावठी बियाण्यांचा वापर केला जातो. साधारणतः एप्रिल व मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्वमशागती उरकून घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असतात.

तर अनेक भागातील शेतकरी मशागती लवकर उरकून रोहिणी नक्षत्राच्या दरम्यान भाताच्या धूळवाफ पेरणी सुरुवात करतात. त्यामध्ये सागाव, मांगले परिसर आघाडीवर असतो. इतर भागातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाचा अंदाज घेत भात पेरणी करतात.

सागाव येथील शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या अगोदरच भाताची धूळवाफ पेरणी करतात व शेताला पाणी देतात. इतर भागातील पिकाच्या तुलनेत सागावला भाताचे आगाप पीक येते प्रतिवर्षी शेतकऱ्यांचा हा प्रयोग चाल असतो. यावर्षी २४ मे रोजी रोहिण नक्षत्र निघत आहे.

मात्र त्या अगोदरच रविवारी सागाव येथे भाताच्या धूळवाफ पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली अनेक शेतकरी पेरणीसाठी एकमेकांन सहकार्य करताना दिसत आहेत.

संकरित वाणांनाच शेतकऱ्यांची पसंती
भाताचे पेरणीसाठी शेतकरी कृषी दुकानात मिळणाऱ्या भाताच्या संकरित वाणांनाच पसंती देत आहेत. साधारण भात हे तीन ते साडेतीन महिन्यात परिपक्च होते. ज्यादा उत्पन्न, बारीक व चविष्ट असणाऱ्या भात वाणांचाच पेरणीसाठी वापर केला जात आहे.

अधिक वाचा: BBF Sowing रुंद सरी वरंबा पध्दतीने पेरणीचे असे होतात फायदे

Web Title: started rohini nakshatra starting crop sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.