Join us

राज्य अन् केंद्राने विमा हप्त्याची रक्कम जमाच केली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2023 1:01 PM

शेतकऱ्यांना तातडीने २५ टक्के आगाऊ विमा रक्कम देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहेत. विमा कंपनी अहवालाचा अभ्यास करून तीस दिवसांनंतर आगाऊ रक्कम देता येईल की नाही, हे जिल्हा प्रशासनाला कळविणार आहे. या प्रक्रियेला कमीत कमी तीस ते साठ दिवस लागणार आहेत.

पीक विमा सर्वेक्षण अहवालानुसार सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांना तातडीने २५ टक्के आगाऊ विमा रक्कम देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहेत. विमा कंपनी अहवालाचा अभ्यास करून तीस दिवसांनंतर आगाऊ रक्कम देता येईल की नाही, हे जिल्हा प्रशासनाला कळविणार आहे. या प्रक्रियेला कमीत कमी तीस ते साठ दिवस लागणार आहेत. विशेष म्हणजे, राज्य व केंद्र सरकारने संबंधित कंपनीकडे अद्याप विमा हप्ता भरलेला नाही. त्यामुळे २५ टक्के विमा रक्कम वाटपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

शेतीपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यातील पिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले. सर्व्हेक्षण अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ७४ महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आगाऊ विमा रक्कम देण्याची अधिसूचना काढली. यंदा साडेपाच लाख शेतकऱ्यांनी प्रती पीक एक रुपये पीक विमा रक्कम भरली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या वतीने विमा रक्कम कंपनीकडे भरते यंदा, शासनाने अद्याप कंपनीकडे विमा रक्कम भरलेली नाही, अशी माहिती ओरिएन्टल विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक जगदीश कोळी यांनी दिली.

विभागीय आयुक्तांना निर्णय कळवणारतीस दिवसांनंतर विमा कंपनी विभागीय आयुक्तांकडे रक्कम देण्याबाबत निर्णय कळवणार आहे. रक्कम देता येणार नसेल तर तसा अहवालही आयुक्तांकडे सादर करणार आहे, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.

साडेपाच लाख शेतकऱ्यांनी भरला विमासोलापूर जिल्ह्यात एकूण ११० महसूल मंडल आहेत. यापैकी ९२ मंडलात हवामान केंद्र संबंधित यंत्रणा कार्यरत आहे. पैकी ७४ मंडलाचा अहवाल बुधवारी जिल्हा प्रशासनाकडे सादर झाला. कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांच्या सूचनेनुसार ७४ मंडलात तातडीने पंचवीस टक्के विमा रक्कम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची कार्यवाही गुरुवारपासून करावी, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बुधवारी काढली. अधिसूचनेची अंमलबजावणी करायला कंपनीला साधारण कमीत कमी दीड ते दोन महिने लागणार असल्याची माहिती कंपनी प्रतिनिधी देत आहेत.

टॅग्स :पीक विमासोलापूरजिल्हाधिकारीपाऊसकेंद्र सरकारराज्य सरकार