Join us

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ८,७७३ पदांची भरती, कसा कराल अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 1:08 PM

'स्टेट बँक ऑफ इंडिया'तील 'ज्युनिअर असोसिएट' या पदासाठी एकूण ८,७७३ पदांच्या भरतीची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी ७ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.

एसबीआय 'मध्ये नोकरीची मोठी संधी आहे. 'स्टेट बँक ऑफ इंडिया'तील 'ज्युनिअर असोसिएट' या पदासाठी एकूण ८,७७३ पदांच्या भरतीची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी ७ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. या पदांसाठी पूर्व परीक्षा जानेवारी- २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा फेब्रुवारी-२०२४ मध्ये होईल. शासकीय नोकरीत करिअर करू इच्छिणाऱ्या शेतकरी युवावर्गासाठीबँक क्षेत्र हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

देशातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, असिस्टंट, क्लर्क, मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी भरती होते. बँकेचे व्यवहार लोकाभिमुख व्हावे म्हणून संगणक प्रणाली योग्यपणे सांभाळणे, कायदेशीर बाबी तपासणे, मनुष्यबळाचा योग्य वापर, नियोजन, प्रशिक्षण, बँकेच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांची गरज असते. या पदांच्या भरतीसाठी दरवर्षी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येते. स्टेट बँकेद्वारे 'ज्युनिअर असोसिएट' भरतीसाठी एस.बी.आय. ज्युनिअर असोसिएट ही स्वतंत्र परीक्षा घेतली जाते.

बँकेची ही परीक्षा होते दोन टप्प्यांत- पूर्वपरीक्षा - १०० गुण- मुख्य परीक्षा - २०० गुण- परीक्षेसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि वय किमान २० वर्षे व कमाल २८ ही पात्रता अट आहे. इतर मागास वर्गासाठी कमाल ३१ वर्षे आहे. तर अनुसूचित जाती व जमातींसाठी ३३ वर्षे आहे.- असोसिएट पूर्व परीक्षा ही १०० गुणांची व १०० प्रश्नांची बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाइन व एक तासाची असते. इंग्रजी व हिंदीत परीक्षा देता येते.

परीक्षेत तीन मुख्य घटक असतातइंग्रजी ३० प्रश्न (२० मिनिटे)- न्यूमरिकल अॅबिलिटी - ३५ प्रश्न (२० मिनिटे)- टेस्ट ऑफ रिझनिंग - ३५ प्रश्न (२० मिनिटे)- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातात.एकूण पदसंख्येच्या १० पट उमेदवारांना पूर्व परीक्षेत उत्तीर्ण करून मुख्य परीक्षेस पात्र ठरविले जाते. अंतिम निकालात पूर्व परीक्षेचे गुण विचारात घेतले जात नाहीत.

अ) ज्युनिअर असोसिएट मुख्य परीक्षा १९० प्रश्नांची व २०० गुणांची असते. ही बहुपर्यायी व ऑनलाइन असते. याकरिता २ तास ४० मिनिटे दिली जातात. परीक्षेत चार मुख्य घटक असतात.ब) इंग्रजी- ४० प्रश्न (४० गुण, ३५  मिनिटे), बँक व अर्थशास्त्र सामान्य क्षमता- ५० प्रश्न (५० गुण, ३५ मिनिटे), टेस्ट ऑफ रिझनिंग व संगणक ज्ञान- ५० प्रश्न (६० गुण, ४५ मिनिटे), क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड- ५० प्रश्न (५० गुण, ४५ मिनिटे)क) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी निर्धारित गुणांच्या ०.२५ गुण वजा केले जातात. मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तायादी तयार केली जाते. या परीक्षेचा ऑनलाइन अर्ज www.statebank of india.com / www.sbi.co.in या संकेतस्थळावरून भरावा लागतो.

प्रा. राजेंद्र चिंचोले(स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक)

टॅग्स :नोकरीस्टेट बँक आॅफ इंडियास्टेट बँक आॅफ इंडियाबँकशेतकरी