Join us

State Sericulture Day : देवगाव येथे राज्य रेशीम दिनानिमित्त रेशीम चर्चासत्र संपन्न

By रविंद्र जाधव | Published: September 02, 2024 11:19 AM

राज्यामध्ये रेशीम योजना प्रभावीपणे राबविणेसाठी दिनांक ०१ सप्टेंबर १९९७ रोजी राज्याचे वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत रेशीम संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. त्यासोबतच सदरील ०१ सप्टेंबर हा दिवस राज्य रेशीम दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

राज्यामध्ये रेशीम योजना प्रभावीपणे राबविणेसाठी दिनांक ०१ सप्टेंबर १९९७ रोजी राज्याचे वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत रेशीम संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. त्यासोबतच सदरील ०१ सप्टेंबर हा दिवस राज्य रेशीम दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

सदरील दिवशी राज्यामध्ये रेशीम संचालनालयाअंतर्गत असणाऱ्या जिल्हा रेशीम कार्यालयांमार्फत रेशीम विषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा रेशीम कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत रविवारी (दि.०१) रोजी देवगाव (ता. पैठण) येथे रेशीम शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पैठणचे तहसिलदार सारंग चव्हाण हे उपस्थित होते.

यावेळी लोखंडे यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीचे आरोग्य सुधारणा करणे तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी प्रत्येकाने स्वत्: चे जमिनीमध्ये मुरविणेसाठी शोषखड्डे घेवून जलतारा संकल्पना राबविणेबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. सदरील जलतारा संकल्पना राबविणेसाठी खड्डे खोदण्यासाठी शासनामार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून देणेविषयी आश्वासित केले तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणेसाठी चर्चासत्र कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत सुचना दिल्या तसेच शासनाच्या विविध योजनांचे माध्यमांतून शेतकऱ्यांनी तसेच गावांनी प्रगती साधावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

तहसिलदार चव्हाण यांनी शासनाच्या विविध योजना शेतकरी स्तरावर राबविणेसाठी कोणत्याही प्रकारची तांत्रिक अथवा प्रशासकिय अडचण येणार नाही तहसिल कार्यालय शेतकऱ्याना मदत करणेसाठी सदैव शेतकऱ्यासमवेत असेल याबाबत आश्वासन दिले.

जिल्हा रेशीम कार्यालय छत्रपती संभाजीनगरचे रेशीम विकास अधिकारी बी.डी. डेंगळे यांनी जिल्हयातील रेशीमचे प्रगतीबाबत माहिती दिली. जिल्हयामध्ये रेशीम धागा निर्मितीसाठी दोन स्वयंचलीत रेशीम धागा निर्मिती केंद्र सुरू करणेसाठी शासनाकडून मान्यता मिळाली असल्याची तसेच जिल्हयातील ५० टक्के रेशीम क्षेत्र हे पैठण तालुक्यामध्ये असून चार बाल अळी संगोपन (चॉकी किटक संगोपन) केंद्र सुरू असलेबाबत माहिती दिली.

तसेच देवगावमध्ये तुती लागवडीखालील क्षेत्र वाढलेले असल्याने देवगाव येथे स्वतंत्र चॉकी किटक संगोपन केंद्र सुरू करणेसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली व त्यासाठी शासनाचे निकष पुर्ण करून चॉकी केंद्र सुरू करणेसाठी शासनामार्फत अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल यासाठी आश्वासन दिले.

सदर प्रसंगी केंद्रिय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. अंकुश घाडगे यांनी उपस्थितांना केंद्रिय रेशीम मंडळाचे कामकाजाविषयी माहिती देवून रेशीम शेतीबाबत मार्गदर्शन केले.

यासोबतच जय जवान जय किसान शेतकरी मंडळाचे अध्यक्ष दिपक जोशी यांनी यांनी शासनाच्या विविध योजना राबवून देवगावमध्ये झालेल्या प्रगतीबाबत माहिती दिली व या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या शेजारील गावच्या लोकप्रतिनिधींनी देखील त्यांचे गावामध्ये शासनाच्या विविध योजना राबवून गावाचा विकास साधावा असे आव्हान केले.

तहसिलदार सारंग चव्हाण यांची उत्कृष्ट तहसिलदार म्हणून निवड झाले बाबत तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हयामध्ये रेशीम शेतीमधून सर्वात जास्त उत्पादन घेतलेल्या शहादेव ढाकणे, सदाशिव गिते यांचा संभाजीनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी देवगावचे सन्माननिय सरपंच, उपसरपंच, ग्राम रोजगारसेवक, जलदूत फाऊंडेशनचे प्रतिनिधी, गावातील विविध संस्थांचे मान्यवर पदाधिकारी व रेशीम शेतकरी उपस्थित होते. जिल्हा रेशीम कार्यालयाचे तांत्रिक सहायक अभिमान हाके यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.

हेही वाचा : Sericulture Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत महेशने शोधली रेशीम शेतीतून नोकरी

टॅग्स :रेशीमशेतीशेतकरीशेतीशेती क्षेत्रपैठणमराठवाडासरकार